Share

“मला कोरोना झाला होती तेव्हा तुम्ही..”, राज ठाकरेंच्या आॅपरेशननंतर आव्हाडांनी दिली ‘ही’ प्रतिक्रीया

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे नुकतेच घरी परतले आहेत. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांना प्रकृतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रवादीचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.(jitendra avhad tweet on raj thakre)

या ट्विटमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लिहिले आहे की, “राज ठाकरे आपल्यावर यशस्वी शस्त्रक्रिया होऊन आपण घरी परतलात आपण लवकरच पूर्ण पणे बरे व्हाल हि आई भवानी कडे प्रार्थना. आपण मी कोरोनातं असताना माझ्या कन्येकडे आस्थेने विचारपूस केली होती हे मी विसरलेलो नाही. राजकारणात वाद असावेत द्वेष नाही”, असे ट्विट राष्ट्रवादीचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

या ट्विटला जितेंद्र आव्हाड यांनी ‘महाराष्ट्र धर्म’ असा हॅशटॅग वापरला आहे. जितेंद्र आव्हाड यांना कोरोना झाला होता, त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीकडे त्यांच्या तब्येतीबद्दल विचारपूस केली होती. या चौकशीबाबत राष्ट्रवादीचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आभार मानले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील एका सभेत आपल्या आजाराबद्दल माहिती दिली होती. काही दिवसांपूर्वी लिलावती रुग्णालयात राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. लिलावती रुग्णालयाचे डॉक्टर विनोद अग्रवाल यांनी ही शस्त्रक्रिया केली होती. राज ठाकरेंची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

रुणालयातून घरी आल्यानंतर राज ठाकरे यांनी एक ट्विट केले होते. त्या ट्विटमध्ये राज ठाकरे यांनी लिहिले होते की, “आपल्या आशिर्वादाने आणि प्रार्थनेने माझी शस्त्रक्रिया व्यवस्थितरीत्या पार पडली! काही वेळापूर्वीच रुग्णालयामधून बाहेर पडून मी घरी पोहचलो आहे. आपले आशिर्वाद आणि प्रेम असेच कायम असो!”

राज ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया व्यवस्थितरीत्या पार पडण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी मंदिरांमध्ये महाआरती केली होती. मुंबईतील मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या प्रकृतीसाठी पूजा देखील केली होती. मशिदींवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरे चर्चेत आले होते. मनसे पक्षाकडून मशिदींवरील भोंग्याच्या विरोधात काही दिवसांपूर्वी आंदोलन करण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या :-
‘राष्ट्रवादी शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करतेय’, बंडखोर आमदारांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांचे आंदोलन
बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रींनी ब्रालेस होऊन दाखवला हॉट अन् बोल्ड लूक, फोटो पाहून व्हाल घायाळ
शिंदेच्या हातात काहीच नाही, त्यांचं त्यांचे खाणे-पिणे, आंघोळ सगळं भाजप ठरवतंय, राऊतांचा दावा

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now