Share

”मोदी सरकारने लोकांचे १५ हजार करोड पेगसेस हे हेरगिरी करणारे सॉफ्टवेअर घेण्यासाठी वापरले”

narendra modi

इस्राईलमधील एनएसओ या खाजगी कंपनीने विकसित केलेल्या पेगसेस स्पायवेअरसंदर्भात अमेरिकेमधील न्यूयॉर्क टाइम्स या आघाडीच्या वृत्तपत्राने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. या खुलाशांमुळे भारताच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.(jitendra avhad tweet on pegasis software)

देशातील राजकीय नेते, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर पेगसेस स्पायवेअर या सॉफ्टवेअरचा वापर करून पाळत ठेवल्याचा आरोप विरोधकांनी मोदी सरकारवर केला होता. यावर मोदी सरकारकडून कोणतेही अधिकृत उत्तर देण्यात आले नव्हते. पण अमेरिकेतील आघाडीचे वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तामध्ये भारताने पेगसेसची खरेदी केल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.

न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तामध्ये पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या इस्राईल भेटीचा आणि पेगसेस स्पायवेअरच्या खरेदीचा संबंध असल्याचा उल्लेख देखील करण्यात आला आहे. जुलै २०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्राईल देशाच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी भारताने इस्राईलसोबत अनेक करार केले होते. या करारांमध्ये पेगसेस स्पायवेअरच्या खरेदीचा देखील करार असल्याचे वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिले आहे.

या प्रकरणावरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर ट्विट करत निशाणा साधला आहे. “१ बिलियन डॉलर म्हणजे ७५०० करोड. २ बिलियन डॉलर म्हणजे १५ हजार करोड. इतक्यासाठी सांगतोय की, देशातील टॅक्सपेयर लोकांचा एवढा पैसा मोदी सरकारने Pegasus हे राजकीय हेरगिरी करणारे सॉफ्टवेअर घेण्यासाठी वापरला आहे,अस न्यूयॉर्क टाइम्सचा रिपोर्ट आहे”, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

https://twitter.com/Awhadspeaks/status/1487313137460150273?s=20&t=vKZVrBhgX2IYzGLPfRqmfw

२०१७ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्राईलचे तत्कालीन पंतप्रधान बेंजामिन नेत्याहून यांच्यात २ बिलियन डॉलरचा शस्त्रास्त्र खरेदीचा करार झाला होता. या करारामध्ये पेगसेस स्पायवेअर या सॉफ्टवेअरचा देखील समावेश होता. यानंतर भारताने सयुंक्त राष्ट्राच्या परिषदेत पॅलेस्टाईन मानवाधिकार संघटनेच्या मान्यतेवर इस्राईलच्या बाजूने मतदान केले होते.

२०१९ साली इस्राईलचे तत्कालीन पंतप्रधान बेंजामिन नेत्याहून यांनी भारताचा दौरा देखील केला होता. भारताने किंवा इस्राईलने पेगसेस खरेदीच्या संदर्भात अधिकृत माहिती दिली नाही. या सर्व घटनांचा उल्लेख व त्याबद्दलची माहिती न्यूयॉर्क टाइम्सने त्या वृत्तात दिली आहे. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या या वृत्तामुळे मोदी सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
“सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला विरोध करणारे शेतकऱ्यांचे शत्रू”
धक्कादायक! आई पब्जी खेळून देत नव्हती म्हणून संतापला मुलगा, आईसह बहिणींनाही गोळ्या घालून संपवले
अपक्ष नगरसेवकाचे पुण्यातून अपहरण, राष्ट्रवादीच्या देशमुखांनी अर्ध्या तासातच डाव उलटवला

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now