Share

तुमच्या घरापासून चैत्यभूमी ५ मिनिटांवर, कधी तिथे गेलात का? बाबासाहेबांना हार घातला का?

raj thackeray

काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत राज ठाकरे(Raj Thakare) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कधी घेत नाहीत. महाराजांच्या पुतळ्याला कधी हार घालत नाहीत. ते फक्त फुले, शाहू आणि आंबेडकर यांचं नाव घेतात, असा आरोप राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेत केला होता.(jitendra avhad statement on raj thakare)

यावर राष्ट्रवादीचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तुमच्या घरापासून चैत्यभूमी ५ मिनिटांवर आहे. तुम्ही कधी चैत्यभूमीवर गेलात का? बाबासाहेबांना हार घातला का? असा उलट प्रश्न गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना विचारला आहे.

राज ठाकरेंच्या सभेननंतर आज राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “मला राज ठाकरेंना हे सांगायचं आहे की असले बालिश आरोप करायचे सोडून द्या. तुमच्या घरापासून चैत्यभूमी ५ मिनिटांवर आहे. तुम्ही कधी चैत्यभूमीवर गेलात का? बाबासाहेबांना हार घातला का?”, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, “महात्मा फुलेंनी छत्रपतींची समाधी शोधली हे सांगायला तुम्हाला लाज वाटते का?, शाहू राजेंनी पहिल्यांदा पुण्यात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला, हे सांगायला तुम्हाला लाज वाटते का?. छत्रपतींना कुणाकुणाचा विरोध झाला, हे सांगायला तुम्हाला लाज वाटते का ?”, असा सवाल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना विचारला आहे.

“इतिहासाशी खेळू नका. इतिहास तुम्हाला अडकवत जातो. इतिहासाच्या ट्रॅपमधून बाहेर येणं आवश्यक असतं. पण तो इतिहास तुम्ही उगाळत बसलाय… खोटा इतिहास जनतेला सांगत आहात”, असे देखील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. महाराष्ट्रदिनी झालेल्या औरंगाबादमधील सभेत राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली होती.

“पवारांना हिंदू या शब्दाची मुळात अ‍ॅलर्जी आहे. महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा आहेच पण त्याआधी आमच्या शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे. त्यांचा विचार घेऊन ते पुढे गेले आहेत. महाराष्ट्रात जातीपातीचा द्वेष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे सुरू झाला”, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी औरंगाबादमधील सभेत केला.

महत्वाच्या बातम्या :-
नवाब मलिक तुरूंगातच कोसळले; प्रकृती गंभीर, तातडीने जे. जे. रूग्णालयात हलवलं
अनुष्का-विराटने शिकवलं खुल्लम खुल्ला प्रेम कसं करायचं, पहा व्हायरल झालेले १० रोमँटिक फोटो
अबू आझमींचा राज ठाकरेंवर निशाणा; म्हणाले, ‘भुंकणाऱ्या कुत्र्यांची तोंड बंद करा..’

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now