महाराष्ट्रात सध्या मशिदींवरील भोंग्यावरून राजकारण तापलं आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मुंबईतील मनसे कार्यकर्ते अधिक आक्रमक होताना दिसत आहेत. मनसे पक्षाकडून सध्या मशिदींवरील भोंग्याविरोधात आंदोलन सुरु आहे. यावरून गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.
राज ठाकरेंना वाटते की ते बाळासाहेब होऊ शकतात पण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा दुसरा कोणी होऊ शकत नाही, अशा शब्दांत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मशिदींवरील भोंग्याविरोधात मनसेच्या सुरु असलेल्या आंदोलनावर देखील भाष्य केलं.
“मशिदींवरील भोंग्याविरोधात पुकारलेल्या आंदोलनाला यश आलं असे राज ठाकरे म्हणत आहेत. ते असं म्हणत आहेत याचा मला खूप आनंद झाला आहे. कारण भोंग्याविरुद्ध पुकारलेल्या आंदोलनामुळे दंगे होतील, जाळपोळ होतील अशी भीती लोकांच्या मनात होती. पण तसे काही झाली नाही. यामुळे राज ठाकरे आंदोलनाला यश आले असं म्हणत असतील तर चांगलेच आहे”, असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.
यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा दुसरा कोणी होऊ शकत नाही. बुद्धांसारखा दुसरा कोणी झाला नाही. सम्राट अशोकांसारखा दुसरा कोणी झाला नाही. राज ठाकरे यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे बनण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे भोंग्याचा विषय काढण्यात आला आहे. कितीही केले तरी राज ठाकरे बाळासाहेब यांच्यासारखे होऊ शकत नाहीत”, असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मुंबईत पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, “काल पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी माझी भेट घेतली. मुंबईमधील काही मशिदींना परवानगी दिल्याची माहिती विश्वास नांगरे पाटील यांनी मला दिली.”
“मुंबईमध्ये बहुतांश मशीदी या अनधिकृत आहेत. त्या मशिदींवरील भोंगे देखील अनधिकृत आहेत. या मशिदींना परवानगी मिळतेच कशी?”, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. आज मुंबईत ९२ टक्के मशिदींवरील भोंग्यांवरून पहाटेची अजाण झाली नाही, अशी माहिती राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महत्वाच्या बातम्या :-
वयाच्या 20 व्या वर्षी ‘ही’ अभिनेत्री स्वतःहून बनली मोठ्या स्टार्सची आई, 250 हुन अधिक चित्रपटात केले काम
10 वर्ष जुना अपघात आठवून अजूनही घाबरतो ‘अजय देवगण’, ‘या’ गोष्टीची वाटते भिती
PHOTO: टीव्हीची सुसंस्कृत सून रश्मी देसाईने पारदर्शक गाऊनमध्ये केले बोल्ड फोटोशूट, सगळं दिसलं आरपार