१०० रूपयांपेक्षा स्वस्त असलेल्या जिओच्या या प्लॅनने घातला धुमाकूळ, मिळणार २१ जीबी डेटा

या कोरोनाकाळात तुम्हाला असे अनेक डेटा प्लॅन्स मिळतीत जेड स्वस्तही आहेत आणि त्यांच्यामुळे अनेकांना फायदा झाला आहे. अनेकांनी या प्लॅन्सचा फायदा घेतला आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत ज्यामुळे तुम्हाला खुप फायदा होणारा आहे.

पण हा प्लॅन फक्त जिओच्या कस्टमर्ससाठी आहे. या प्लॅनमुळे सामान्य लोकांना सर्वात जास्त फायदा मिळणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी १४ दिवसांपर्यंत आहे. फक्त ९८ रूपयांना हा प्लॅन मिळणार आहे. या प्लॅनमध्ये युजरला रोज १.५ जीबी डेटा मिळणार आहे.

म्हणजे १४ दिवसांच्या व्हॅलिडीटीमध्ये युजरला २१ जीबी डेटा मिळणार आहे. यासोबत तुम्हाला फक्त २१ जीबी डेटाच नाही मिळणार तर या पॅकचे अनेक फायदे तुम्हाला होणार आहोत. या प्लॅनच्या अंतर्गत युजर्सला कोणत्याही नंबरवर फ्री कॉलिंगची सुविधा मिळणार आहे.

तसेच यामध्ये तुम्हाला जिओच्या ऍप्सचे फ्री सब्सक्रिप्शन देण्यात येणार आहे. या ऍप्समध्ये जिओ टिव्ही, जिओ सिनेमा, जिओ न्युज, जिओ सिक्युरीटी आणि जिओ क्लाऊड यांचा समावेश आहे. या ऍप्सचे सब्सक्रिप्शन तुम्हाला फ्रिमध्ये मिळणार आहे.

तुम्हाला माहिती नसेल पण या प्लॅनला मागच्या वर्षी कंपनीने बंद केले होते पण आता या प्लॅनला पुन्हा चालू करण्यात आले आहे. आता हा जिओचा सगळ्यात स्वस्त प्लॅन बनला आहे. मागील काही दिवसांपुर्वी जिओने एका ऑफरची घोषणा केली होती.

या ऑफरच्या अंतर्गत युजरने एक रिचार्ज केल्यानंतर दुसरे रिचार्ज फ्रि दिले जात आहे. कंपनीने हा निर्णय कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे घेतला आहे. त्यामुळे युजरला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि लॉकडाऊनमध्ये युजर्सला मदत व्हावी.

महत्वाच्या बातम्या
लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांनो सावधाव! रस्त्यावर फिरतेय माणसांना उचलणारी गाडी
मिर्झापुर सीरीजमधील अभिनेत्यावर आली वाईट वेळ? अक्षरश रस्त्यावर लाडू विकतोय
राज्यात आणखी १५ दिवसांचे लॉकडाऊन होणार; राजेश टोपे यांचे सुचक वक्तव्य
चंद्रकांत पाटील ही भाजपने मराठा समाजाशी केलेली गद्दारी नाही का? गंभीर पुरावे उघड करत ‘या’ नेत्याचा आरोप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.