जिओमीट ॲप झाले लॉन्च; एकाच वेळी १०० लोकांबरोबर करता येणार मोफत व्हिडिओ कॉन्फरन्स

 

मुंबई | रिलायन्स जिओने मोठ्या प्रतिक्षेनंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ॲप जिओमीट लॉंच केले आहे. जिओमीटची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती पण जिओने त्याला आज अधिकृतपणे सादर केले.

जिओमीट या ॲपवरून मोफत एचडी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग करता येणार असून हे ॲप गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करता येणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे जिओमीट ॲप वरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करताना इन्व्हाईट कोडची आवश्यकता पडणार नाही. मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी वरून यात सहभागी होता येणार आहे.

या ॲप वर एकाच वेळेस १०० पेक्षा अधिक वापरकर्ते जोडले जाऊ शकतात.लॉकडाऊन मध्ये अनेक लोक घरून काम करत असल्यामुळे त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.