आयपीएलसाठी जिओने सुरू केले काही खास प्लॅन

आयपीएलचे आयोजन मार्च किंवा एप्रिल महिन्यात केले जाते. परंतु, यावर्षी कोविड-१९ आउटब्रेक मुळे याच्या आयोजनात उशीर झाला आहे. देशातील सर्वात मोठी खासगी कंपनी Reliance Jio ने क्रिकेट चाहत्यांसाठी दोन नवीन प्रीपेड प्लान लाँच केले आहेत. या दोन्ही प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात आयपीएल क्रिकेटचे सामने फ्री मध्ये पाहता येणार आहेत.

आयपीएलचा सुरू होणार आहे. अशावेळी कोणत्याही अडथळ्याशिवाय आयपीएलचे सामने पाहता यावे याकरता जिओने काही नवीन टेरिफ प्लॅन लाँच केले आहेत. आयपीएल-१३ साठी असणारे हे  एक्सक्लूझिव्ह प्लॅन्स आहेत.

जिओने हे नवे प्लॅन्स ‘जिओ क्रिकेट प्लॅन’ (Jio Cricket Plan) अंतर्गत लाँच केले आहेत. या प्लॅनमध्ये यामध्ये डेटा आणि व्हॉईस कॉलिंगसह एका वर्षाचे डिझ्नी प्लस हॉटस्टार (Disney Hotstar)चं VIP सब्सक्रिप्शन मिळेल.

संपूर्ण सामना एकापेक्षा जास्त वेळा पाहण्यासाठी जिओ क्रिकेटच्या प्लॅनमध्ये अॅड-ऑन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

Disney Hotstar अ‍ॅपद्वारे फ्री लाइव्ह ड्रीम 11 आयपीएल मॅच पाहता येतील. हॉटस्टारच्या या सब्सक्रिप्शनची किंमत 399 रुपये आहे. ‘जिओ क्रिकेट प्लॅन’ मध्ये 1 महिना ते 1 वर्ष वैधता असणारे प्रीपेड प्लॅन्स आहेत. वैधता कितीही असली तरी हॉटस्टारचे एका वर्षाचे सब्सक्रिप्शन मिळणार आहे.

तसेच जिओ क्रिकेट प्लॅन 401 रुपयांपासून 2599 रुपयांपर्यंत आहेत. 401 रुपयांच्या प्लॅनची 28 दिवसांची वैधता असणार आहे. 401 रुपयांच्या प्लॅनमध्ये दिवसाला 3 जीबी डेटा मिळेल.

598 रुपयांच्या प्लॅनमध्ये रोज 2 जीबी डेटा उपलब्ध असेल. त्याची वैधता 56 दिवसांची आहे. तर 84 दिवसांच्या प्लॅन्सची किंमत 777 रुपये असून यामध्ये रोज 1.5 जीबी डेटा मिळेल. तर 2599 रुपयांच्या वार्षिक प्लॅनमध्ये रोज 2 जीबी डेटा मिळणार आहे.

तसेच Rs 499 add-on Jio Cricket Plan अंतर्गत ग्राहकांना 56 दिवसांसाठी वैधता असणाऱ्या प्लॅनमध्ये प्रति दिन 1.5 जीबी डेटा मिळेल तर एका वर्षाचे डिझ्नी प्लस हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन देखील मिळेल.

त्यामुळे जिओने क्रिकेट प्रेमींसाठी मेजवानीच दिली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.