त्यादिवशी अंधश्रद्धेमुळे ९०० पेक्षा जास्त लोकांनी केली होती आत्महत्या; जाणून घ्या ‘त्या’ भयानक घटनेबद्दल

आजच्या काळा कोणी पण अंधश्रद्धा पाळताना दिसून येत नाही. आधी अंधश्रद्धा पाळण्याचे प्रमाण जास्त होते. इतिहासात अशा काही घटना घडल्या आहे, ज्यांचा विचार केला तर आजही थरकाप उडतो.

अशीच एक भयानक घटना साऊथ अमेरिकेच्या गुयानामध्ये झाली होती, या घटनेत तब्बल ९०० लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या सर्व लोकांनी धर्मगुरु जिम जोंस यांनी सांगितल्यामुळे आत्महत्या केली होती.

या घटनेमुळे पुर्ण जगभरात खळबळ माजवली होती. या घटनेमागे धर्मगुरु जिम जोंस नावाच्या धर्मगुरुंचा हात होता. हा धर्मगुरु स्वत:ला देव म्हणवून घ्यायचा. त्याच्यामुळेच तब्बल ९०० लोकांनी आत्महत्या केली होती.

जिम जोंसने लोकांनामध्ये आपली ओळख वाढवण्यासाठी १९५६ मध्ये पिपल्स टेंपल नावाचे एक चर्च बनवले होते. तिथे त्याने धार्मिक गोष्टी आणि अंधविश्वासाच्या गोष्टी सांगुन हजारो लोकांना अनुयायी बनवले होते. जिम जोंस हा कम्युनिस्ट विचारधारेचा होता.

जोंसची विचारधारा कम्युनिस्ट असल्याने अमेरिकेची विचारधारा ही त्याच्या विचारधारेशी खुप वेगळी होती. त्यामुळे त्याला ते शहर सोडून जंगलात जावे लागले होते. गुयानाच्या जंगलात जाऊन एक गाव वसवले होते. पण काहीच दिवसात त्याचे सत्य लोकांसमोर आले होते.

जोंस त्याच्या अनुयायांकडून दिवसभर काम करुन घ्यायचा. तसेच जेव्हा ते थकून घरी झोपायला जायचा प्रयत्न करायचे तर तो त्यांना झोपून पण नाही द्यायचा. त्याचे शिपाई प्रत्येक माणसाच्या घरात जाऊन बघायचे की कोणता माणूस घरी झोपत नाहीये ना. जर एखादा व्यक्ती झोपलेला असला त्याला कठोर शिक्षा दिली जायची.

जोंसला जेव्हा कळाले की सरकार त्याला बंदी बनवण्याचा प्रयत्न करत आहे, तेव्हा तो सावधान झाला होता. त्याने एक विषारी पेय तयार केले होते आणि ते विषारी पेय लोकांना प्यायला देत होता. अशाप्रकारे अंधविश्वासात ९०० पेक्षा जास्त लोकांनी हे पेय पिऊन आत्महत्या केली होती. त्यामध्ये ३०० मुलं होती.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ शहरात मिळत आहेत फक्त 12 रुपयांमध्ये घर
कोण तुषार भोसले? त्याची अवकात काय मोठ होण्यासाठी सत्ताधाऱ्यांवर टीका करतात – प्रशांत जाधव
“तुझ्या वयाच्या अभिनेत्री सोबत काम कर” सोफिया हयातने घेतला सलमान खानशी पंगा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.