Share

‘या’ दोन शेअर्समुळे झुनझनवालांचे १५ मिनिटांत बुडाले ९०० कोटी, तुमच्याकडे आहेत का हे शेअर्स?

बिग बुल राकेश झुनझुनवाला यांना शेअर बाजारात मोठया नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. शुक्रवारी शेअर बाजार उघडल्यानंतर बिग बुल राकेश झुनझुनवाला(Rakesh Jhunjhunwala) यांचे अवघ्या १५ मिनिटांत सुमारे ९०० कोटींचे नुकसान झाले आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील दोन शेअरमध्ये शुक्रवारी कमालीची घसरण झाली.(Jhunjhanwala lost Rs 900 crore in 15 minutes due to these two shares)

त्यामुळे राकेश झुनझुनवाला यांचे तब्बल ९०० कोटींचे नुकसान झाले. शुक्रवारी शेअर बाजार उघडल्यानंतर टायटन आणि स्टार हेल्थ कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. टायटन कंपनीचे शेअर्स ६.०९ टक्क्यांनी घसरले. तर स्टार हेल्थ कंपनीचे शेअर ४.५४ टक्क्यांनी घसरले. यामुळे राकेश झुनझुनवाला यांना मोठे नुकसान सहन करावं लागलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून टायटन कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर विकले जात आहे. त्यामुळे टायटन कंपनीचे शेअर्सच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. शुक्रवारी शेअर बाजार उघडल्यानंतर टायटन कंपनीचा शेअर झपाट्याने घसरला. गुरुवारी टायटन कंपनीच्या शेअरची किंमत २,०६० रुपये होती.

शुक्रवारी या शेअरच्या किंमतीत ६३.९५ टक्क्यांची घसरण झाली. त्यामुळे या शेअरची किंमत शुक्रवारी कमी होऊन १९३५ रुपये झाली होती. तसेच टायटन कंपनीच्या शेअरप्रमाणे स्टार हेल्थ कंपनीच्या शेअरच्या किंमतीत देखील मोठी घसरण नोंदवण्यात आली. शुक्रवारी शेअर बाजार उघडल्यानंतर स्टार हेल्थ कंपनीच्या शेअरची किंमत ५५ रुपयांनी कमी झाली आहे.

गुरुवारी या शेअरची किंमत ६६४ रुपये होती. शुक्रवारी या शेअरची किंमत कमी होऊन ६०९ रुपये झाली आहे. शेअर मार्केटचे बिग बुल राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे ३,५३,१०,३९५ शेअर्स आहेत. राकेश झुनझुनवाला यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे ९५,४०,५७५ शेअर्स आहेत.

तसेच राकेश झुनझुनवाला यांचे स्टार हेल्थ कंपनीमध्ये १०,०७,५३,९३५ शेअर्स आहेत. या शेअरच्या किंमतीत २५५ रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे राकेश झुनझुनवाला यांचे ५५५ कोटींचे नुकसान झाले आहे. तसेच टायटन कंपनीच्या माध्यमातून राकेश झुनझुनवाला यांचे ३५० कोटींचे नुकसान झाले आहे. राकेश झुनझुनवाला यांचे एकत्रितरित्या तब्बल ९०० कोटींचे नुकसान झाले आहे.

महत्वाच्या बातम्या :-
पोलीस अधिकाऱ्याचा अजब प्रताप, मॉर्निंग वॉकसाठी आणि मुलांच्या स्केटिंगसाठी बंद केला रस्ता
रोहित शर्माने शार्दुल ठाकूरला दिली होती धमकी, म्हणाला होता, ‘मॅच जिंकलो की मग याला बघतो
स्वार्थी होते भारतीय खेळाडू, चिप्ससाठी पुर्ण सिरीज टाकली होती धोक्यात, टिम पेनचा मोठा खुलासा

 

ताज्या बातम्या आर्थिक

Join WhatsApp

Join Now