विद्यार्थीनीचे शिक्षकाशी होते प्रेमसंबंध, मंदीरात जाऊन गुपचुक केलं लग्न आणि…

सध्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील प्रेम संबंधाच्या अनेक घटना समोर आहे. आता अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विद्यार्थीनीचे शिक्षकावरच प्रेम जडले आणि त्यानंतर त्या दोघांनी पोलिस स्टेशन गाठले आहे.

ही घटना झारखंडच्या धनबाद जिल्ह्यातील आहे. या घटनेमुळे तिथल्या परीसरात एकच खळबळ उडाली आहे. या परिसरातील एका विद्यार्थीनीचे आपले शिक्षकाबरोबरच प्रेम जडले आणि त्यानंतर त्या दोघांनी लग्न केले आहे.

लग्न झाल्यानंतर त्यांनी धनबाद येथील महिला पोलिस स्टेशन गाठले आहे. तसेच दोघांनी पण पोलिसांकडे आपल्याला सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. सबंधित शिक्षक आणि विद्यार्थीनी सुवरिया गावचे रहिवासी आहे.

विद्यार्थीनीचा प्रियकर मुलीला शिकवण्याचे काम करायचा. पण शिकवता शिकवता दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. पण विद्यार्थीनीचे कुटुंब तिचे लग्न ठरवण्याच्या तयारीत होते. त्यामुळे त्यांनी दोघांनी कुटुंबाला प्रेमाविषयी सांगितले. पण कुटुंबाने परवानगी दिली नाही.

तसेच शिक्षकासोबत लग्न होऊच शकत नाही, असे म्हणत लग्नास नकार दिला. पण विद्यार्थीनीला त्या शिक्षकासोबतच लग्न करायचे होते. कुटुंबाने विरोध केल्यामुळे दोघांनी पण लग्न करायचे ठरवले. त्या दोघांनी पण भुईफोड मंदिरात लग्न केले आणि पोलिस स्टेशन गाठले.

गेल्या चार वर्षांपासून ते दोघे पण एकमेकांना ओळखत असल्याचे त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये सांगितले आहे. आम्ही लग्न केले आहे, पण या लग्नाला कुटुंबाचा विरोध आहे. त्यामुळे आम्हाला आता सुरक्षा हवी आहे, असे दोघांनी म्हटले आहे. यावेळी महिला पोलिस नंदीनीकुमार यांनी कुटुंबाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे, पण कुटुंबाचा लग्नाला विरोध आहे.

महत्वाच्या बातम्या-

३०० रुपयांची नोकरी ते करोडोंचे मालक, मोठ्या शहरात घरे, विमाने, हेलिकॉप्टर, जाणून घ्या अदानी यांची संपत्ती..
पहिली पत्नी रीना दत्ताचे पत्र वाचून अमीर खानला झाले अश्रू अनावर
ब्रेकिंग! भाजप खासदार नारायण राणे दिल्लीत, केंद्रात मंत्रीपद मिळण्याची शक्यता

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.