‘ही’ आहे जेठालालची खऱ्या आयुष्यातील पत्नी; सुंदरतेमध्ये देते मोठ्या मोठ्या अभिनेत्रींना टक्कर

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ टेलिव्हिजनवरील सर्वात प्रसिद्ध कार्यक्रम आहे. या कॉमेडी कार्यक्रमाला फक्त भारतातच नाही तर जगभरात पाहिले जाते. सगळीकडे या सिरियलचे करोडो चाहते आहेत. गेल्या १२ वर्षांपासून हा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

२००८ मध्ये सब टीव्हीवर या सिरियलची सुरुवात झाली होती. या मालिकेतील प्रत्येक पात्र खुप प्रसिद्ध आहे. त्यामुळे सगळ्या कलाकारांचे लाखो चाहते आहेत. पण काही कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.

असेच एक अभिनेते म्हणजे तारक मेहतामधील जेठालाल. अभिनेते दिलीप जोशी मालिकेत जेठालालची भुमिकां साकारत आहेत. या मालिकेची सुरुवात झाल्यापासून ते जेठाची भुमिका निभावत आहेत.

त्यांच्या या भुमिकेचे वेगळे चाहते आहेत. दिलीप जोशीला त्यांच्या खऱ्या नावापेक्षा जेठालाल याच नावाने ओळखले जाते. १९८९ मध्ये दिलीप जोशी गुजरात नाट्य भुमी सोडून अभिनय करण्यासाठी मुंबईला आले होते.

अनेक वर्षे बॉलीवूडमध्ये मेहनत केल्यानंतर देखील त्यांना काही खास यश मिळाले नाही. म्हणून त्यांनी टेलिव्हिजनवर काम करायला सुरुवात केली. छोट्या पडद्यावर त्यांना चांगलेच यश मिळाले. त्यांचा अभिनय आणि कॉमिक टाईमिंग प्रेक्षकांना खुप आवडला.

दिलीप जोशी टेलिव्हिजनवरचे खरे हिरो आहेत. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले. तर ते खऱ्या आयुष्यात विवाहित आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव जयमाला जोशी आहे. त्या दिसायला खुपच सुंदर आहेत.

जयमाला आणि दिलीपला रित्विक आणि नियती ही दोन मुलं आहेत. त्यांच्या पत्नी अभिनय क्षेत्रापासून दुर राहतात. पण अनेक वेळा त्या दिलीपसोबत अवॉर्ड फंक्शनला दिसतात. दिलीप जोशीला त्यांच्या पत्नीने सर्वाधिक मदत केली आहे.

महत्वाच्या बातम्या-
काय सांगता! सरकारचे इलेक्ट्रिक दुचाकी खरेदीवर ३० हजार तर चारचाकी खरेदीवर १ लाख ५० हजारांचे अनुदान
अरे व्वा! सोन्याच्या दरात मोठी घसरण, २० दिवसांत ३२९२ रुपयांनी स्वस्त; आताच घ्या, कारण..
राहुल वैद्यला मागे टाकत रुबीना दिलैक ठरली बिग बॉस १४ची चॅम्पियन…
सावधान! कोरोनाचा नवा स्ट्रेन आधीपेक्षाही जास्त धोकादायक, एम्स प्रमुखांनी केलं सावध

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.