तारक मेहतातील जेठालालचे मानधन ऐकून होश उडतील; मोठमोठ्या सेलिब्रीटींना टाकलय मागे

टेलिव्हिजनवरच्या काही मालिका आपल्यासाठी खुप खास असतात. कारण आपण गेल्या अनेक वर्षांपासून त्या मालिका बघत असतो. त्या मालिकेसोबत आपल्या अनेक आठवणी असतात. ती मालिका नेहमी आपले मनोरंजन करत असते.

अशीच एक मालिका इंडियन टेलिव्हिजनवर आहे. ही मालिका भारतातील प्रत्येक व्यक्तीसाठी खुप खास आहे. कारण गेले १२ वर्ष ही मालिका आपले मनोरंजन करत आहे. आपल्या सर्वांना हसवत आहे.

ही मालिका आहे सब टिव्हीवरील ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’. गेले १२ वर्ष ही मालिका आपले मनोरंजन करत आहे. टेलिव्हिजनवर सर्वाधिक काळ चालणाऱ्या मालिकांमध्ये या मालिकेचा समावेश होतो.

जेठालाल, तारक मेहता, आत्माराम भिडे,अय्यर, बबीता, माधवी, अंजली कोमल, डॉ हाथी आणि संपूर्ण टपूसेना भारतामध्ये प्रसिद्ध आहे. हि मालिका लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे मनोरंजन करत आहे. सर्वजण हि मालिका बिंधास्तपणे पाहू शकतात.

आज आम्ही तुम्हाला या मालिकेतील कलाकारांच्या मानधनाबद्दल सांगणार आहोत.

जेठालाल हे मालिकेतील सर्वात महत्त्वाचे पात्र आहे. दिलीप जोशीने जेठालालच्या पात्राला चांगलंच प्रसिद्ध केले आहे. जेठालाल म्हणजेच दिलीप जोशीला एका भागासाठी १.५ लाख रुपये मिळतात.

जेठालालचे सर्वात जवळचे मित्र तारक मेहता. शैलेश लोढा यांनी हे पात्र निभावले आहे. शैलेश लोढाला एका भागाचे १ लाख रुपये मिळतात. तर अंजली भाभी म्हणजेच सुनैना फौजदारला या मालिकेच्या एका भागासाठी २० ते २५ हजार रुपये मानधन दिले जाते.

जेठालालचे बापूजी म्हणजेच अमित भटला ७० ते ८० हजार रुपये मिळतात. अमित भट यांनी बापूजी या पात्राची भूमिका खुप चांगल्या पद्धतीने निभावली आहे. बबिता जी यांनी त्यांच्या सुंदरनेते सर्वांना वेड लावले आहे. मुनमून दत्ताने हे पात्र निभावले आहे. मुनमून दत्ताला या पात्रासाठी ३५ ते ५०हजार रुपये मिळतात.

आत्माराम भिडे यांची पत्नी माधवी भिडे यांची भुमिका सोनालीका जोशी यांनी निभावली आहे. या भूमिकेसाठी सोनालीकाला ४० हजार रुपये मिळतात. रोशन सिंग सोढी, अंजली मेहता या मालिकेतील सर्व महिला कलाकारांना ३५ ते ५० हजारांच्या दरम्यान मानधन मिळते.

अब्दुलची भुमिका शरद सकललाने निभावली आहे. या मालिकेत शरद सकल म्हणजेच अब्दुलला एका भागाचे ३५-४० हजार मिळतात. गुरुचरण सिंग याने सोढीची भुमिका निभावली आहे. तर अनुज महाशब्देने अय्यरची भूमिका निभावली आहे. या दोघांना या मालिकेसाठी ६५-८० हजार मिळता

तारक मेहता का उल्टा चश्मा ही टेलिव्हिजनवरची सर्वात हिट मालिका आहे. हि मालिका नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. २००८ मध्ये सब टिव्हीवर ही मालिका सुरू झाली होती.

या मालिकेची खासियत म्हणजे यातील विनोद. यामध्ये अगदी हलकेफुलके विनोद दाखवले जातात. त्यामूळे हि मालिका सहपरिवार सहकुटूंब पाहता येते. टेलिव्हिजनवर खुप कमी मालिका एवढा काळ चालतात.या मालिकेचे आतापर्यंत दोन हजार ३००० एपिसोड्स प्रसारित झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

बापाने आश्रमात जायचा निर्णय घेतल्यावर पाच वर्षाच्या साध्याभोळ्या अक्षय खन्नाने काय केलते पहा..

सुशांत प्रकरणात आता रितेश देशमुखची उडी; रियाला दिला उघड पाठिंबा देत म्हणाला..

शेतकऱ्यांना नडणाऱ्या कंगनाला भिडला शेतकरी; चांगलाच उतरवला माज

तुम्हाला माहितीय? भारतातील जातीप्रथा संपवण्यासाठी वाघ बकरी चहा सुरू करण्यात आला होता

बॉलीवूड एकवटलं! रिपब्लिकन टिव्ही, टाईम्स नाऊ विरोधात सलमान, शाहरुख, आमीर कोर्टात 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.