‘तारक मेहता’ मालिकेतील जिवलग मित्र तारक मेहता आणि जेठालाल खऱ्या आयूष्यात आहेत दुश्मन

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ टेलिव्हिजनवरील सर्वाधिक काळ चालणारा कार्यक्रम आहे. या मालिकेची खासियत म्हणजे यातील विनोद. यामध्ये अगदी हलकेफुलके विनोद दाखवले जातात. त्यामूळे हि मालिका सहपरिवार सहकुटूंब पाहता येते.

मालिकेच्या याच विषेशतेमूळे हि मालिका गेले तेरा वर्ष लोकांचे मनोरंजन करत आहे. टेलिव्हिजनवर खुप कमी मालिका एवढा काळ चालतात. या मालिकेचे आतापर्यंत तीन हजार भाग पुर्ण झाले आहेत.

एवढा काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या मालिकेचे प्रेक्षकांच्या मनात खुप वेगळे स्थान आहे. पण गेले काही दिवस मालिकेबद्दल अनेक धक्कादायक गोष्ट समोर येत आहेत. मालिकेतील कलाकार एक एक करुन मालिका सोडून जात आहेत.

आत्ता मालिकेशी निगडीत अजून एक गोष्ट समोर आली आहे. त्यामूळे मालिकेच्या प्रेक्षकांना धक्का बसला आहे. मालिकेत चांगल्या मित्रांची भुमिका निभावणाऱ्या कलाकारांचे खऱ्या आयूष्यात मात्र बिलकूल पटत नाही. त्यामूळे आत्ता मालिकेच्या निर्मात्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

हे दोन कलाकार दुसरे तिसरे कोणी नसून मालिकेत जिवलग मित्रांची भुमिका निभावणारे कलाकार जेठालाल आणि तारक मेहता आहेत. मिळालेल्या माहीतीनूसार मालिकेत एकमेकांचे खास मित्र असणारे जेठालाल आणि तारक मेहता खऱ्या आयूष्यात मात्र एकमेकांशी बोलणे देखील पसंत करत नाहीत.

हे ऐकल्यानंतर अनेकांना धक्का बसत आहे. कारण मालिकेत दोघांचे काम खुपच उत्तम आहे. त्यांची जोडी बघितल्यानंतर ते खऱ्या आयूष्यातही चांगले मित्र असतील असे समजले जाते. पण ही गोष्ट खरी नाही.

दिलीप जोशी आणि शैलेश लौढा खऱ्या आयूष्यात एकमेकांशी बोलत नाहीत. एवढेच नाही तर दोघांना एकमेकांचा चेहरा पाहायला देखील आवडत नाही. ते फक्त सीनसाठी एकत्र येतात आणि सीन पुर्ण झाल्यानंतर आपापल्या रुममध्ये जाऊन बसतात.

असे बोलले जात आहे की, काही कारणांमूळे दोघांमध्ये वाद आहेत. मालिका सुरु होण्या अगोदरपासूनच दोघांचे भांडण असल्याचे बोलले जाते. पण गेले अनेक वर्ष मालिकेत दोघांची मैत्री पाहायला मिळत आहे.

त्यामूळे दोघांच्य नात्याबद्दल हे सत्य ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. पण ही गोष्ट मात्र खरी आहे. मालिकेत एकमेकांचे जिवलग मित्र असणारे जेठालाल आणि तारक मेहता खऱ्या आयूष्यात एकमेकांचे दुश्मन असल्यासारखे आहेत.

सध्या तारक मेहता मालिकेबद्दल अनेक रहस्य बाहेर येत आहेत. ज्यामूळे मालिकेच्या टिआरपीवर देखील परिणाम पडत आहे. पण मालिकेचे निर्माते असित मोदी मालिकेला या सर्व अडचणींपासून वाचवण्याचा प्रयत्न करत मालिकेला पुढे नेत आहेत.

२८ जुलै २००८ मध्ये या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला आणि आता या मालिकेला तब्बल बारा वर्षे पूर्ण झाली आहेत. जेठालाल, तारक मेहता, आत्माराम भिडे,अय्यर, बबीता, माधवी, अंजली कोमल, डॉ हाथी आणि संपूर्ण टपूसेना भारतासोबत जगभर प्रसिद्ध झाले आहेत.

हि मालिका लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे मनोरंजन करत आहे. सर्वजण हि मालिका बिंधास्तपणे पाहू शकतात. या मालिकेतील बहुतेक व्यक्तिरेखांना चांगलीच लोकप्रियता मिळाली. लवकरच ही मालिका ऍनिमेशनच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

ज्या मैत्रिणीने वाईट दिवसांमध्ये मदत केली; त्याच मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत होते स्मृती इराणीचे अफेअर

असे काय झाले की, जिगरी यार मनोजकुमार आणि प्राणची मैत्री तुटली

राजेश खन्ना कधीच स्वतःचे चित्रपट टिव्हीवर पाहत नव्हते; कारण ऐकून थक्क व्हाल

अंकिता लोखंडेने सांगितला कास्टिंग काऊचचा अनूभव; म्हणाली, रूममध्ये नेऊन…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.