जेईई-एडवांस आणि नीट परीक्षांच्या नवीन तारखा झाल्या जाहीर

 

नवी दिल्ली | मानव संसाधन विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी आज राष्ट्रीय इंजिनीअरिंग आणि मेडिकल प्रवेश परीक्षासंबंधी माहिती दिली.

विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता आम्ही जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

जेईई मेनची परीक्षा आता १ ते ६ सप्टेंबर या दरम्यान होणार असून जेईई एडवांसची परीक्षा २७ सप्टेंबर आणि नीटची परीक्षा १३ सप्टेंबरला आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षण मंत्रालयात ने विशेषज्ञांच्या एका पॅनलला याची समीक्षा करून एक अहवाल देण्यास सांगितले होते. या पॅनलने कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा सल्ला दिल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

यंदा होणाऱ्या जेईई परीक्षेसाठी ९ लाख आणि नीट साठी १६ लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.