Share

अवघ्या ११.२२ सेकंदात शर्यत जिंकत मालकाला जिंकून दिला जेसीबी, ‘या’ जोडीची पुर्ण राज्यात चर्चा

देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत म्हणून पिंपरी-चिंचवड शहरातील शर्यतीकडे पाहिलं जातं होतं. दीड कोटींच्या बक्षिसांमुळे पिंपरी-चिंचवड मधील बैलगाडा शर्यत चर्चेत होती. जेसीबी, बोलेरो, ट्रॅक्टर, बुलेट, ११६ दुचाकी अशी बक्षिसे बैलगाडा शर्यतीसाठी ठेवण्यात आली होती.

पिंपरी-चिंचवड शहरातील बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी पुण्यासह अजूबाजूच्या बैलगाडा शर्यत शौकीनांनी हजेरी लावली होती. राज्यातील राजकीय दिग्गजांनी देखील बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी हजेरी लावली होती. बैलगाडा शर्यतीमध्ये राजकीय दिग्गजांनी जोरदार फटकेबाजी देखील केल्याचं पहायला मिळालं आहे.

आमदार महेश लांडगे यांनी भरवलेल्या बैलगाडा शर्यतीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून गाडामालकांनी सहभाग नोंदवला होता. बैलगाडा शर्यतीसाठी तब्बल दोन हजार टोकन वाटप करण्यात आले होते. दोन हजार टोकन मधील १ हजार २०० बैलगाडा शर्यतीत धावले आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये रामनाथ वारिंगे यांच्या बैलजोडीने अवघ्या ११:२२ सेकंदात बैलगाडा घाट सर करत जेसीबी जिंकून दिला आहे. रामनाथ वारिंगे यांच्यासह चार बैलजोड्यांनी कमी वेळात ही घाट सर केला होता. रामनाथ वारिंगे यांच्या बैलजोडीने कमी वेळेत घाट पार केला आहे.

रामनाथ वारिंगे याच्या बैलजोडीने घाट पार केल्या नंतर जेसीबी पाच जणांमध्ये विभागून देण्यात आली आहे. पहिल्या क्रमांकामध्ये आणखी चार बैलगाडे ११:२२ सेकंदाच्या खालोखाल आल्याने हे बक्षीस विभागून देण्यात आले आहे. लक्षवेधी बक्षीसांची मेजवानी असल्यामुळे शर्यतीला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे.

पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेत जेसीबी विजेत्यांची नावे- रामनाथ विष्णू वारिंगे ११:२२ सेकंद, राजू शेठ जवळेकर ११:२४, संतोष ज्ञानेश्वर मांडेकर ११:३१, बाबुराव बाबाजी वाईकर ११:३६, अजिंक्य खांडेभराड ११:३७, बोलेरो विजेते- सुनिल शेळके मावळ आमदार ११:४०, भैरवनाथ मित्र मंडळ करंजविहीरे-११:५६, पांडुरंग किसन काळे-११:५६, तृतीय क्रमांक ट्रॅक्टर विजते- भालेराव साहेब कदम-११:६६, रामशेठ बाबुराव थोरात मयूर हॉटेल-११:५६.

महत्वाच्या बातम्या:-
आई शेळ्या-म्हशी पाळून चालवायची घर, शिक्षकांनी केली मदत; विशालने UPSC क्रॅंक करत साकारले स्वप्न
केंद्राने सगळाच्या सगळा जिएसटी राज्याला परत दिलाय, आतातरी पेट्रोल डिझेलचे दर कमी करा..
याला म्हणतात प्रेम! प्रसिद्ध अभिनेत्रीने पतीसाठी केलं टक्कल, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक

 

 

 

 

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now