तब्बल २३ वर्षांचे शत्रुत्व विसरुन भाजप नेत्याला भेटले ज्योतिरादित्य सिंधिया; जाणून घ्या शत्रुत्वाचे कारण

तब्बल २३ वर्षांनंतर ज्योतिरादित्य सिंधिया आणि जयभान सिंह पवैया हे दोघे आता २३ वर्षांच्या शत्रुत्वानंतर पुन्हा एकत्र दिसून आले आहे. २३ वर्षांचे शत्रुत्व सोडून शुक्रवारी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी जयभान पवैया यांची भेट घेतली आहे.

१९९८ मध्ये लोकसभा निवडणूकीत यांची शत्रुत्वाला सुरुवात झाली होती. त्या लोकसभा निवडणूकीत माधव सिंधिया यांना जिंकण्यासाठी पवैया यांच्यामुळे खुप संघर्ष करावा लागला होता. या निवडणूकीत सिंधिया यांचा जरी विजय झाला असला, तरी त्यांना इतके कमी मतं मिळतील हे त्यांना वाटले नव्हते.

सिंधिया यांना तो मतदार संघ इतका असुरक्षित वाटला की पुढच्या निवडणूकीत त्यांनी त्यांचा मतदार संघच बदलून घेतला. त्यांनी गुना हा मतदार संघ निवडत तिथे लोकसभा निवडणूक लढवली होती. इथे ज्योतिरादित्य सिंधिया निवडणूक लढवतात, त्यामुळे दुश्मनी अजून वाढत गेली. सिंधिया कुटुंबावर टीका करणे अशी पवैया यांची ओळख बनली होती.

माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी १९८४ मध्ये ग्वालियरमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. तेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांचा पराभव माधवराव सिंधिया यांनी केला होता. पण १९९८ मध्ये लोकसभा निवडणूकीत माधवरावांना पवैया यांच्यामुळे संघर्ष करावा लागला होता.

२०१४ च्या लोकसभा निवडणूकीत पवैया यांनी गुना हा मतदार संघ निवडला. त्या मतदार संघातून ज्योतिरादित्य सिंधिया निवडणूक लढणार होते. त्यामुळे ज्योतिरादित्य सिंधिया यांना इथे संघर्ष करावा लागला होता. दरवेळी ४ लाख मतांना जिंकणारे सिंधिया त्यावेळी फक्त १ लाख २० हजार मतांनी निवडणूक जिंकली होती.

अशा राजकारणाच्या शत्रुत्वामुळेच २३ वर्षे ते एकमेकांच्या घरी कधीच गेले नव्हते. पण ज्योतिरादित्य सिंधिया जेव्हा भाजपमध्ये आले तेव्हा सर्व परिस्थिती बदलली आणि दोघांमधले शत्रुत्व पण कमी झाले. दोघांची भेट जवळपास ३० मिनिटे झाली.

एके नवे नाते आता तयार झाले आहे. भुतकाळात जे झालं ते आता विसरायला हवं. आता हा वर्तमान आहे आणि आम्ही दोघे पण पक्षाचे कार्यकर्ते आहोत, असे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटले आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

‘ही तर बेसुऱ्यांची फौजच!’ सोनू कक्कडनं नुसरत फतेह अलींचं गाणं गायल्यावर लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया
संभाजीराजेंचा साधेपणा, ताफा थांबवून शेतात केलं जेवण; पहा व्हिडिओ
कार्याला सलाम! महाराष्ट्र पोलीस रेहाना बनल्या कोरोना संकटात सापडलेल्या ५० मुलांच्या आई

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.