“जगात कोरोना नाही, त्यामुळे मी ही आता मास्क काढला आहे! जयंत पाटलांचे धक्कादायक विधान

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रकोप झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने राज्यातील अनेक शहरांमध्ये संचारबंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना संबधीचे नियम पाळणे, मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग याचे पालण करणे गरजेचं आहे.

तर दुसरीकडे राज्य सरकार लाॅकडाऊन करण्याच्या विचारात असतानाच जगात कोरोनाच नाही, त्यामुळे मी ही आता मास्क न घालता काढून ठेवल्याचं धक्कादायक आणि तितकेचं बेजबाबदार वक्तव्य जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलं आहे.

पाटील यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत प्रचाराचा धडाका लावला आहे. पाटील यांनी प्रचारसभांवर भर दिला असून आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांना निवडून देण्याचं आवाहन करत आहेत. याच एका प्रचारसभेदरम्यान पाटील यांनी चक्का मास्क काढून भाषण केलं.

आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचार सभेला पाटलांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी तुमचे चेहरे बघितल्यावर जगात कोरोना नसल्याची खात्री पटली आहे. त्यामुळे मीही मास्क काढूनच बोलतो, असे म्हणत पाटील यांनी मास्क काढून भाषणाला सुरुवात केली.

दरम्यान, नुसता मास्क काढून पाटील थांबले नाहीत, तर मास्क काढण्याचं समर्थनही त्यांनी केलं. तसेच मंत्र्यांच्या सभेत सोशल डिस्टन्सींग फज्जा उडाल्याचे ही दिसून आले. पोलिस काय कारवाई करणार याकडेच लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

…तर लॉकडाऊन लावावा लागेल; अजित पवारांनी दिला सूचक इशारा

शिवसेना नगरसेवकाच्या मुलीच्या लग्नात तुफान गर्दी; कोरोना नियमांचे उल्लंघन, तोंडावर मास्क पण नाही

ऐश्वर्या रायमूळे सलमान खानने तोडले होते सहा वर्षाचे रिलेशनशिप; दिला होता सोमी अलीला धोका

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.