वडीलांच्या निधनामुळे अमेरिकेतून थेट राजकारणात एन्ट्री, सलग ९ वेळा अर्थसंकल्प मांडणारे एकमेव अर्थमंत्री, वाचा..

आज आम्ही तुम्हाला राष्ट्रवादीची मुलुखमैदानी तोफ जयंत पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीबद्दल माहिती सांगणार आहोत. प्रचंड अभ्यासू नेते, प्रश्नांची जाण असलेले नेते, हजरजबाबीपणा आणि एखाद्याची हसता हसता फिरकी घेणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

लोकनेते राजराम बापू पाटील यांचे ते चिरंजीव आहेत. त्यांनी राज्याच्या राजकारणात आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. राज्याच्या मुख्यमंत्री पदाचे दमदार दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा आपण आज आढावा घेणार आहोत. जयंत पाटील मुळचे इस्लामपुर तालुक्यातील साखराळे या गावचे रहिवासी आहेत. त्यांचा जन्म १६ फेब्रुवारी १९६२ रोजी झाला होता.

स्वर्गीय राजारामबापू पाटील यांचे चिरंजीव असलेल्या जयंत पाटील घरातूनच राजकारणाचा वारसा मिळाला होता. राजारामबापू काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांना वडिलांकडूनच राजकारणाचे धडे मिळाले होते.

जेव्हा ते अर्थमंत्री होती तेव्हा त्यांनी सलग ९ वेळा अर्थसंकल्प मांडला होता. ग्रामविकास मंत्री आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी पद सांभाळले आहे. त्यांचे वडील राजारामबापू पाटील हे महाष्ट्रातील एक लोकप्रिय नेते होते.

त्यांनी १९६२ पासून १९७० पर्यंत तसेच १९७८ मध्येही राज्यात मंत्रीपद भुषविले आहे. १९८४ मध्ये त्यांचे अचानक निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर जयंत पाटलांना तातडीने अमेरिकेतून भारतात यावे लागले.

ते अमेरिकेच्या न्यूजर्सी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण घेतले होते. भारतात परतल्यानंतर त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले. त्यांनी १९९० मध्ये पहिली निवडणूक लढवली होती. तेव्हा ते २८ वर्षांचे होते.

इस्लामपूर वाळवा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. गेल्या ३० वर्षांपासून ते निवडून येत आहेत आणि ते ही ६० हजारांपेक्षा जास्त मतांनी. १९९९ ते २००८ पर्यंत ते राज्याचे अर्थमंत्री होते.

२०१४ पुर्वी पृथ्वीराज चव्हाण मंत्रीमंडळात ते ग्रामविकास मंत्री होते. सध्या त्यांच्याकडे जलसंपदा मंत्रीपद आहे. महाविकास आघाडीतील ते महत्वाचे नेते आहेत. जयंत पाटील हे इस्लामपूरचे आमदार आहेत. ते विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते.

तब्बल ९ वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. आर आर पाटील यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर जयंत पाटलांकडे हे पद आले होते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांचे सर्वात विश्वासू नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

२०१९ मध्ये त्यांच्याकडे राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली होती. या पदासांठी धनंजय मुंडे, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील यांची नावे चर्चेत होती. मात्र पवारांनी आपला विश्वास जयंत पाटलांवर दाखवला.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याशीही त्यांचे चांगले नाते आहे. जानेवारी २०२१ मध्ये जयंत पाटील यांनी राज्यभरात राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा राबवली होती. त्यांनी या यात्रेच्या निमित्ताने १७ दिवस तीन हजार किलोमीटर प्रवास केला होता.

त्यांनी अनेक सभा घेतल्या. तळागळातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या यात्रेमुळे राष्ट्रवादीचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. जयंत पाटील यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे असं त्यांनी एकदा जाहीर बोलून दाखवलं होतं.

ते म्हणाले होते की राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार जे काही निर्णय घेतील तो मला मान्य आहे. राजकीय जीवनात सर्वोच्च पद मिळवणे हे प्रत्येकाचीच इच्छा असते असे ते म्हणाले होते. त्यांचे सध्या ५९ वर्षे वय आहे. त्यांनी बी.ई सिव्हील इंजिनिइरींगचे शिक्षण घेतले आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

महत्वाच्या बातम्या
अजबच! आता कोरोनावर दारू ठरतेय प्रभावी, ‘या’ डॉक्टरने केला विचीत्र दावा
प्राजक्ता गायकवाडचे लवकरच ‘लॉकडाऊन लग्न’; पहा तयारीचे व्हिडिओ आणि फोटोज
बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रींसोबत आहे माधूरी दिक्षितचा ३६ चा आकडा; जाणून घ्या कोण कोण आहेत त्या अभिनेत्री
इथेही फिक्सींग! ‘खतरों के खिलाडी ११’ चा विजेता कोण असणार हे अभिनेत्रीने स्पर्धेआधीच सांगीतलं

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.