जयंत पाटील भाजपच्या संपर्कात? खुद्द पाटलांकडून खुलासा, म्हणाले…

मुंबई | ‘आज महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं नसतं तर जयंत पाटील हे भाजपामध्ये असते. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांची याबाबत बोलणीही झाली होती. पाटलांच्या इस्लामपुरात जाऊन हे सर्व मी उघड करणार असल्याचे भाजपा नेते नारायण राणे यांनी म्हंटले होते.

आता याचाच धागा पकडत जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. ट्वीट करत पाटील म्हणतात, ‘दुसऱ्यांच्या पक्षात जाण्यापेक्षा मला माझा पक्ष वाढवण्यात जास्त रस आहे. आलेली सत्ता जाते व ती पुन्हा मिळवता येते ही पवार साहेबांची शिकवण असल्याचे पाटील यांनी म्हंटलं आहे.

तसेच ते पुढे म्हणतात, ‘राणे साहेबांची भाजपच्या वरीष्ठ नेत्यात गणती होत नाही हे जाणून खेद झाला. भाजपच्या कुठल्या वरिष्ठ नेत्यांशी माझी कधी, कुठे चर्चा झाली याचा तपशील मला कळला तर माझ्या ज्ञानात भर पडेल,’ असा टोला पाटील यांनी राणेंना लगावला आहे.

याचबरोबर ‘माझ्या पुरते सांगायचे झाले तर माझी भाजपच्या कोणत्याही वरीष्ठ नेत्याशी भाजपमध्ये जाण्याबाबत चर्चा झाली नाही म्हणून हा खुलासा. मी शरद पवार साहेबांचा कार्यकर्ता असल्याने असा विचार माझ्या मनात कधीच शिवत नाही. त्यामुळे मागील ५ वर्षे सरकारच्या विरोधात विधीमंडळात लढत होतो,’ असे पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराच्या प्राचारार्थ बोलताना पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. “गंजलेल्या तोफेतून आलेल्या गोळ्यांना उत्तर द्यायचं नसतं” अशा शब्दांत पाटील यांनी राणेंची खिल्ली उडवली होती.

महत्त्वाच्या बातम्या
बातमी कामाची! ट्रॅक्टर खरेदीसाठी पाच लाख रुपयांचे अनुदान; असा करा अर्ज
वॉर अँड पीस! आत्मह.त्येआधी डॉक्टर शीतल आमटेंची सूचक पोस्ट
‘ही’ कंपनी म्हणतेय आमची लस आहे कोरोनावर १००% प्रभावी; पहा कोणती आहे ती कंपन‘हजारो शेतकऱ्यांसोबत 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.