सहकाऱ्याच्या निधनाने जयंत पाटील भावूक; आठवणी जागवतानाच अश्रुंचा बांध फुटला

मुंबई | राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक जगदीश पाटील यांच्या अकाली निधनानंतर बोलताना जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सहकाऱ्याच्या अस्थी विसर्जनावेळी अश्रू अनावर झाले.

रविवारी सांगली येथे अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘लोकनेते राजारामबापू पाटील यांच्याशी वैचारिक बांधिलकी असणारे अनेक जण मला लाभले. या लोकांच्या ताकदीनेच आज मी इथपर्यंत आलो आहे. मात्र तीच माणसे आज माझ्या हातून निसटत आहेत.’

तसेच जगदीश पाटील यांच्या कार्याविषयी बोलत असतानाच अचानक जयंत पाटील यांच्या अश्रूंचा बांध फुटला आणि ते काही काळासाठी जयंत पाटील स्तब्ध झाले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक जे. वाय. पाटील, राजारामबापू दुध संघाचे संचालक जगन्नाथ पाटील, अशोक पाटील, इस्लामपूर शहराचे माजी नगराध्यक्ष विजय पाटील असे अनेक जवळचे लोक पाटील यांनी या काळात गमावले आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
संजय दत्तला ‘त्या’ अवस्थेत बघून श्रीदेवीने त्याला धक्के मारून सेटवरुन हाकलून दिले होते
अक्षयकुमारच्या सासुसोबत सनी देओलचे तब्बल ११ वर्षे अफेअर सुरू होते; घरी समजल्यावर मात्र..
हेमामालिनीने एक चुगलीमुळे धर्मेंद्रने गोविंदाच्या कानाखाली वाजवली होती; जाणून घ्या पुर्ण किस्सा..
एखाद्या चित्रपटाच्या फिल्मी स्टोरीप्रमाणे ‘या’ अभिनेत्याचे कुटुंब एका रात्रीत संपले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.