देवाकडे जास्त बघत नाही, आईकडे बघतो; आईच्या आठवणीत जयंत पाटील भावूक

मुंबई | आई आणि मुलाचं नातं सर्वात जास्त  मायेचं नातं असतं. आई आपल्या मुलासाठी काहीही करायला तयार असते. आईने जन्म देऊन आपल्याला आयुष्य दिलेले असते. आपला मुलाने मोठं होऊन नाव कमवावे अशी इच्छा प्रत्येक आईची असते.

नेता, सेलिब्रिटी, खेळाडू, उद्योगपती कुणीही असू आपल्या आईवर जीवापाड प्रेम करत असतात. आईच्या निधनानंतर अनेक प्रतिष्ठीत व्यक्ती आईच्या आठवणीत भावूक झाले असल्याचं आपण पाहतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आईच्या आठवणीत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

जलसंपदामंत्री जयंत पाटील  सोशल मिडियावर व्हिडिओ शेअर केला आहे यामध्ये ते आईच्या आठवणीत भावूक झाले आहेत. जयंत पाटील यांच्या मातोश्री कुसूम राजाराम पाटील यांचे परिवारासोबतचे फोटो आणि जयंत पाटील यांच्या आवाजात व्हिडिओ पोस्ट केला आहे.

जयंत पाटील म्हणतात, मला माझी आई देवासमान होती. तिच्या बोलण्यात वागण्यात साधेपणा आणि आपुलकी होती. चुकीचं करायचं नाही हे आम्ही तिच्याकडून शिकलो. संपुर्ण आयुष्यात. बापू सतत महाराष्ट्रभर फिरतीला असल्यामूळं आईचेच संस्कार आमच्यावर जास्त होते.

आईसाठी मी कधीही तडजोड केली नाही. आजही देवाकडे जास्त बघत नाही आईकडे जास्त बघतो. असं  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले आहेत. जयंत पाटील यांच्या आईचे २९ डिसेंबर २०१७ रोजी वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले होते.

जयंत पाटील हे सांगली जिल्ह्यातील साखराळे गावचे आहेत. इस्लामपुर विधानसभा मतदारसंघातून जयंत पाटील तब्बल ६ वेळा निवडून आले आहेत. जयंत पाटील यांचे वडिल राजारामबापू पाटील काँग्रेसचे नेते होते. जयंत पाटील यांच  राजकारणात मोठं नाव आहे. त्यांनी अनेक पदांवर काम केलं आहे.

महाविकास आघाडी राज्यात सत्तेत आल्यानंतर जयंत पाटील यांच्या गळ्यात मंत्री पदाची माळ टाकण्यात आली. मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर जयंत पाटील आईच्या आठवणीत भावूक झाले होते.  आज आई असती तर तिला खुप आनंद झाला असता अशी भावनिक पोस्ट त्यांनी लिहिली होती.

महत्वाच्या बातम्या-
माझ्या परिवाराला तुझ्यामुळे सोडून जात आहे; आत्महत्येआधी अल्पवयीन मुलीचं भावूक करणारं पत्र
आजोबांचे वय ८० वर्षे पण छंद तरूण मुलांसारखे, आतापर्यंत खरेदी केल्यात ८० पोर्शे सुपरकार्स
दोस्तीसाठी कायपण! मित्राच्या आईसाठी ४२० किलोमीटरचा प्रवास करुन फक्त ८ तासात पोहचवले रेमडेसिवीर
सचिन तेंडूलकरला टाकली एक ओव्हर अन् त्या बॉलरचे अख्खे करियर झाले उध्वस्त; पहा व्हिडिओ

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.