Share

jayant patil : “शिंदे गटातील आमदार म्हणतात, कुठून अवदसा आठवली या नादाला लागलो”

jayant patil

jayant patil : राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन होऊन तब्बल दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री पदाचा स्वीकार केल्यानंतर तब्बल महिन्यानंतर शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार पार पडला.

अनेकांना शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळात स्थान मिळाले नाही. यामुळे शिंदे गटात कुठतरी नाराजी नाट्य पाहायला मिळालं. अनेकांनी शिंदे गटाला घरचा आहेर दिला आहे. तर आता अशातच नाशिक दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांबाबत मोठा दावा केला आहे.

‘कुठून आम्हाला अवदसा आठवली आणि नादाला लागलो, असं काही आमदार आम्हाला खासगीमध्ये म्हणतात. आमदार फार नाराज आणि निराश झाले आहेत,’असं जयंत पाटील यांनी म्हंटलं आहे. ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. सध्या पाटील यांच्या व्यक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.

पुढे बोलताना पाटील म्हणाले, ‘भाजपला आपल्या संख्याबळाची कायम भीती लागून राहिलेली आहे. आधी १२३ आमदार निवडून आले होते. मागच्या निवडणुकीत ती संख्या घटून १०५ वर आली आणि आता जे काही केले आहे, त्यामुळे जनता नाराज आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत तीच संख्या ८० ते ८५ पर्यंत खाली येते की काय, अशी भीती भाजपला सतावतेय.’

दरम्यान, शिंदे सरकार स्थापन होऊन खूप दिवस झाले, मात्र अद्याप मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. बारामतीमध्ये येऊन भाजपला छुप्या पद्धतीने विकास बघायचा आहे. भाजपला माहिती आहे की बारामतीत आपण जिंकू शकत नाही, असा दावा पाटील यांनी केला.

याचबरोबर पुढे बोलताना पाटील म्हणाले, ‘शिंदेंसोबत असलेल्या सगळ्या 40 जणांना मंत्री व्हायचं आहे, त्यामुळे आता एकनाथ शिंदे अडचणीत आहेत. 106 आमदार असणाऱ्यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं, त्यामुळे ते सगळे 106 आमदार नाराज असल्याचा मोठा दावा पाटील यांनी केला आहे.

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now