‘पवारसाहेब काळजी करु नका, पंढरपूरचा कार्यक्रम आमचा आम्ही करतो’

मुंबई : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार नाव निश्चित करण्यात आलं आहे. दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाकडून समाधान महादेव आवताडे यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे.

भगीरथ भालके यांना पोटनिवडणुकीसाठी मैदानात उतरवलं आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रवक्ते जयंत पाटील पंढरपुरात होते. त्यावेळी त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. याबाबत ते माध्यमांशी बोलत होते.

यावेळी पाटील यांना शरद पवार हे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी येणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारले असता जयंत पाटील म्हणाले की, ‘पवारसाहेब तुम्ही पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीची काळजी करु नका. तुम्ही प्रकृतीची काळजी घ्या, इकडचा कार्यक्रम आमचं आम्ही करतो.’

पाटील म्हणाले की, पवारांना किडनी स्टोनचा त्रास होत आहे. आवश्यकतेनुसार येत्या काही दिवसात त्यांच्यावर शस्त्रक्रिया होईल, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते बाहेर पडतील, मात्र आम्ही त्यांना सांगितले आहे की, पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदार संघाची आपण काळजी करु नका, हा मतदारसंघ पवार साहेबांना मानणारा वर्ग असलेला आहे.’

महत्त्वाच्या बातम्या 

एवढ्या वर्षांनंतर पद्मिनी कोल्हापूरेने केला खुलासा; ‘या’ कारणामुळे हिट चित्रपटाला दिला होता नकार

एसपीला वाचविण्यासाठी त्याने झेलले तलवारीचे वार, आयसीयुमध्ये मृत्युशी देतोय झुंज

“संजय राऊत यांच्या सारख्या बकबक करणाऱ्यांची वाझे प्रकरणात चौकशी करा”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.