एकेकाळी १० रुपयात चित्रपट करणाऱ्या जयाप्रदा आज करोडोंच्या मालकीण; आहेत पाच पाच बंगले

८० आणि ९० च्या दशकामध्ये जया प्रदाने फिल्मी पद्यावर राज्य केले आहे. साऊथसोबतच बॉलीवूडमध्ये देखील जया प्रदाच्या नावाचा दबदबा होता. जया प्रदाला इंडस्ट्रीतील सुंदर आणि यशस्वी अभिनेत्र्यांमध्ये गणले जात होते.

आज जया प्रदा ५९ वर्षांच्या झाल्या आहेत. पण तरीही त्यांच्या सुंदरतेमध्ये बिलकुल कमी झाली नाही. आजही त्या खुप सुंदर आणि फिट दिसतात. त्यांना पाहून वयाचा अंदाजच लावता येत नाही.

त्यांचा जन्म आंध्रप्रदेशमध्ये झाला होता. पुढे जाऊन त्यांनी साऊथसोबतच बॉलीवूडमध्ये देखील चांगलेच नाव कमवले. ४४ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी २०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

त्यांनी अमिताभ बच्चन, जितेंद्र आणि मिथून चक्रवर्तीसारख्या मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले. पण त्यांची जोडी सर्वाधिक गाजली ती म्हणजे जितेंद्रसोबत. २०१८ नंतर त्या चित्रपटांपासून पुर्णपणे दुर गेल्या.

करिअरच्या सुरुवातीला फक्त १० रुपये घेऊन चित्रपट करणाऱ्या जया प्रदा करोडोंच्या संपत्तीच्या मालकीण आहेत. त्या अनेक महागड्या गोष्टींच्या मालकीण आहेत. त्यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार जया प्रदा पाच बंगल्याच्या मालकीण आहेत. त्यांचे हे बंगले गुडगाव, मुंबई, चेन्नई आणि हैद्राबादमध्ये आहेत. जया त्यांच्या कुटुंबासोबत मुंबईतील बंगल्यात राहतात. या बंगल्याची किंमत ३५ करोड आहे.

जया प्रदाकडे गाडी आणि घरचं नाही तर अनेक महागड्या गोष्टी आहेत. त्यांच्याकडे दोन किलो सोन्याचे तर दिड किलो चांदीचे दागिने आहेत. त्यासोबतच त्यांच्याकडे 1 करोड किंमत असणारी गाडी देखील आहे.

जया प्रदा आज लाईमलाईटपासून दुर असल्या तरी राजकारणात मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत. २००४ मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता आणि आज त्या राजकारणातील प्रसिद्ध चेहरा बनल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

शाहिद कपूरच्या बायकोने बिकनी घालून केले सोशल मीडियावरचे वातावरण गरम; पहा फोटो

बॉलीवूडवर कोरोनाचा कहर! अनेक कलाकारांनी प्राॅपर्टी विकत मुंबईला दिला निरोप

रविना टंडनने तिच्या सवतीच्या डोक्यात फोडला होता काचेचा ग्लास; कारण ऐकून धक्का बसेल..

एका विवाहित पुरुषाच्यामागे झाली होती वेडी, रेखा यांनी दिली कबुली; म्हणाल्या…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.