अभिनेत्री जया बच्चन पहिल्यांदाच मराठी चित्रपटात करणार काम; पहा कोणता आहे तो चित्रपट..

मुंबई | महानायक अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन लग्नानंतर चित्रपटात काम करताना दिसल्या नाहीत. जया बच्चन यांनी दिग्दर्शक सत्यजीत रे यांच्या ‘महानगर’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूड पासून दुर असलेल्या जया बच्चन लवकरचं मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी याआधी मराठी चित्रपटात काम केले नव्हते. त्या पहिल्यांदाच मराठी चित्रपटात काम करताना पाहायला मिळणार आहेत. त्या अनेक दिवसातून पडद्यावर दिसणार म्हटल्यावर त्यांच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बाब आहे.

मराठी दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मार्च महिन्यात चित्रपटाचे शुटींग सुरू होणार असून अवघ्या 20 दिवसांत सिनेमाचं शुटींग पुर्ण केलं जाणार आहे. मात्र या सिनेमाचे नाव आजूनही समोर आलं नसल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये कोणता सिनेमा येणार आहे. याची उत्सुकता लागली आहे.

दरम्यान काही दिवसांपुर्वी जया बच्चन मुलगी श्वेता बच्चन सोबत पल्लो लटके गाण्यावर थिरकताना दिसल्या होत्या. मायलेकीच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला होता.

महत्वाच्या बातम्या-
विराटच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या अनुष्काने ‘तो’ फोटो शेअर करत , म्हणाली….
चिरंजीवी सर्जाची पत्नी मेघनाने दाखवली मुलाची पहिली झलक; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
‘राज’ चित्रपटातील ‘ही’ अभिनेत्री आठवली का? जाणून घ्या आज काय करते
खेड्यातील चिमुकल्याच्या भन्नाट डान्सवर धक धक गर्ल माधुरीही फिदा, व्हिडीओ शेअर करत म्हणते…

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.