Rekha : बॉलीवूडमध्ये काही हिट जोड्या आहेत. या जोड्या खुप आहेत. कारण या जोड्या ज्या चित्रपटामध्ये असतील. तो चित्रपट हिट होतो. अशीच एक जोडी आहे अमिताभ बच्चन आणि रेखाची. रेखा बॉलीवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री आहेत. तर अमिताभ बच्चन बॉलीवूडचे महानायक आहेत. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.(Amitabh Bachchan, Rekha, Jaya Bachchan)
पण एका काळा अमिताभ बच्चन यांनी रेखासोबत काम करणे बंद केले होते. जाणून घेऊया असे काय झाले होते ज्यामुळे अमिताभ बच्चन यांनी रेखासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. ७० च्या दशकामध्ये अमिताभ बच्चन आणि रेखाने अनेक हिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. जसे की, नमक हाराम, मिस्टर नटवरलाल, राम बलराम असे अनेक चित्रपट आहेत.
याच कालावधीमध्ये रेखा आणि अमिताभ यांचा मुक्कदर का सिकंदर हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाच्या एका प्रीमियरला अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांची पुर्ण फॅमिली आली होती. अमिताभ बच्चन, जया बच्चन, अमिताभ यांचे आई वडील अशी पुर्ण फॅमिली आली होती. सर्वजण प्रीमियरसाठी खुप आनंदी होते.
चित्रपट सुरू झाला होता. पण रेखा चित्रपट पाहण्यासाठी बाहेर आल्या नाहीत. त्या ऑफिसमध्ये बसल्या होत्या. पण त्यांना तिथे बसूनसुध्दा बाहेर काय सुरू आहे ते सगळे काही दिसत होते. चित्रपट सुरु झाला होता. या चित्रपटामध्ये अमिताभ आणि रेखा यांचे काही इंटिमेट सीन्स होते. ते सीन सुरु झाल्यानंतर जया बच्चन यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यामूळे त्या तिथून बाहेर निघून गेल्या.
त्या बाहेर गेल्यानंतर अमिताभ बच्चनसुध्दा त्यांच्या मागे गेले. बाहेर अमिताभ आणि जया यांचे या गोष्टीवरून खुप भांडण झाले. ही गोष्ट रेखाला समजली होती. त्यामूळे त्या दुःखी झाल्या. कारण त्या काळी अमिताभ बच्चन आणि रेखा यांचे आफेअरचे अनेक चर्च होते. त्यात चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन्स ही जया बच्चन यांना अजिबात आवडली नाही.
जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांच्याकडून वचन घेतले की ते यानंतर रेखासोबत कधीही काम करणार नाहीत. अमिताभ बच्चन यांनी देखील वचन दिले की ते रेखासोबत काम करणार नाहीत. पण अमिताभ आणि रेखा यांची जोडी त्याकाळी खुप हिट होती. त्या दोघांनी अगोदरच अनेक चित्रपट साइन केले होते. त्या चित्रपटाची शुटिंग त्यांनी पुर्ण केली.
त्यानंतर यश चोप्रा यांच्या सांगण्यावरून अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि रेखा यांनी सिलसिला चित्रपटामध्ये एकत्र काम केले आहे. पण त्यानंतर मात्र हे कधीही एकत्र दिसले नाहीत.
महत्वाच्या बातम्या
health : मोफत ऑपरेशनच्या नावाखाली वृद्धाचे खरे डोळे काढले अन् बसवली काचेची गोटी; डोळे चोरणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड
politics : शिवसेना स्थापना झाली तेव्हा तु कोंबडीची पीसं उपटत होता काय? तुझी उंची किती, डोकं केवढं
Vinayak Raut : २००३ मध्ये आम्ही बाळासाहेबांना डावलून..; विनायक राऊतांनी जाहीर सभेत कबुल केली चूक






