रेखाच्या भांगेतल सिंदूर पाहून जया बच्चनने रेखाच्या कानाखाली वाजवली होती; वाचा पुर्ण किस्सा..

लग्न हा आनंदाचा समारंभ असतो. पण अनेक वेळा लग्नासारख्या शुभ समारंभात देखील अनेक अडचणी निर्माण होतात. अनेक वेळा लग्नात मोठी भांडण होतात. भांडण फक्त सामान्य माणसांच्या लग्नातच होत नाहीत. तर अनेक वेळा बॉलीवूड कलाकारांच्या लग्नात देखील होतात.

हा किस्सा आहे १९८० चा. बॉलीवूडच्या एका मोठ्या लग्नात ही घटना घडली होती. लग्नातील सगळं वातावरण खुप आनंदी होते. अनेक मोठे मोठे कलाकार आणि नेते या लग्नात उपस्थित होते.

सर्व पाहुणे लग्न समारंभात येत होते. अनेक मीडिया रिपोर्टर्स देखील या लग्नात उपस्थित होते. पण ज्यावेळी लग्नात अभिनेत्री रेखाची एन्ट्री झाली. त्यावेळी मात्र सर्वांच्या नजरा रेखावर गेल्या. कारण या लग्नात रेखा नव्या नवरीसारख्या तयार होऊन आल्या होत्या.

रेखाने त्यांच्या भांगेत सिंदूर भरले होते. रेखाचा हा लुक पाहून सर्वांना धक्का बसला. कारण त्यांचा विवाह झाला नव्हता. मग त्यांनी सिंदूर कोणाच्या नावाचे लावले आहे? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला होता.

त्यावेळेस अमिताभ बच्चन आणि रेखा या दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरू होत्या. अमिताभ बच्चनने जयाजींसोबत लग्न केले. त्यामूळे रेखा खुप नाराज झाल्या. पण लग्नानंतरही त्या दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरू होत्या.

असे बोलले जात होते की, रेखा आणि अमिताभ बच्चनने लपून लग्न केले. म्हणून रेखा लग्नात सिंदूर लावून आल्या होत्या. रेखाच्या त्या लूकमूळे लग्नात अमिताभ बच्चन आणि रेखाच्या चर्चा होत होत्या.

ही गोष्ट बघून जया बच्चन खुप चिडल्या. त्यांनी लग्नातून घरी जाण्याचा निर्णय घेतला. त्या अमिताभकडे गेल्या आणि लग्नातून निघायला सांगितले. ही गोष्ट त्यांनी ऐकली नाही. ते लग्नात आलेल्या पाहुण्यांना भेटत होते.

जयाजी खुप रागात होत्या. त्या एका कोपऱ्यात जाऊन उभ्या राहिल्या. त्यांनी रेखाकडे बघितले तर रेखा सारख्या सारख्या अमिताभकडे बघत होत्या. त्यांनी एकदा दोनदा ते बघितले. पण नंतर मात्र त्यांचा राग अनावर झाला.

त्या रागात रेखाकडे गेल्या आणि त्यांनी रेखावर ओरडायला सुरुवात केली. रेखाने देखील त्यांच्या प्रश्नांची चांगलीच उत्तरे दिली. त्या दोघींमधला वाद वाढत गेला आणि जयाजींनी रेखाच्या कानाखाली वाजवली.

अमिताभ हे सगळे काही बघत होते. पण त्यांनी या दोघींच्या भांडणात हस्तक्षेप केला नाही. कारण त्यांच्याकडे रेखा आणि जया या दोघींच्या प्रश्नांची उत्तरे नव्हते. ते शांत हे सगळे काही बघत होते.

पण ज्यावेळी या दोघींचा हा वाद वाढला. त्यावेळी मात्र त्यांना या दोघींच्या भांडणात हस्तक्षेप करावा लागला. तिथे सगळी मीडिया उपस्थित होती. म्हणून अमिताभ बच्चन जया बच्चनला घेऊन घरी गेले आणि त्यांना समजावून सांगितले.

या भाडणांमूळे लग्नात चांगलाच तमाशा झाला होता. पण शेवटी हा वाद मिटला. त्या दिवसानंतर रेखा आणि जया बच्चन एकमेकींच्या चांगल्याच दुष्मन झाल्या. आजही त्या फक्त कामासाठी एकमेकींशी बोलतात.

हे ही वाचा –

आपल्या सासरच्या माणसांसोबत ऐश्वर्या रायचे आहेत ‘असे’ संबंध; ननंद श्वेतासोबत असे बॉण्ड करते शेअर

दया भाभीने सांगितला पहिल्या पगाराचा किस्सा; म्हणाली…

प्राजक्ता माळीच्या फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग; पहा फोटो

बापरे! टेलिव्हिजनवरील सर्वात महागडा कॉमेडीयन आहे कपिल शर्मा; जाणून घ्या एकूण प्रॉपर्टी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.