जया बच्चनने संजीव कुमारला भिकारी समजून सेटवरुन काढले होते बाहेर; वाचा पुर्ण किस्सा

चित्रपटांमध्ये काम करत असताना कलाकारांना अनेकदा नवीन रुप धारण करावी लागतात. एकाच चित्रपटासाठी त्यांनी वेगवेगळे मेकअप आणि कपडे परिधान करावे लागतात. त्यांचे मेकअप आणि कपड्यांमूळे कधी कधी त्यांना ओळखणे देखील कठिण असते.

सेटवरील लोकं मेकअपच्या मागे असणाऱ्या खऱ्या माणसाला ओळखू शकत नाहीत. असे अनेक किस्से बॉलीवूडमध्ये झाले आहे. यातलाच एक किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा किस्सा आहे अभिनेते संजीव कुमार आणि जया बच्चनचा.

जया बच्चन इंडस्ट्रीतील काही सुंदर आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहेत. अनेक मोठ्या मोठ्या अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केले आहे. पण एकदा मात्र जया बच्चनने संजीव कुमारला भिकारी समजून सेटवरुन हाकलून दिले होते. ज्यामूळे सगळीकडे या गोष्टीची खुप जास्त चर्चा रंगली होती.

जया बच्चन मद्रासमध्ये ‘नया दिन नयी रात’ चित्रपटाची शुटींग करत होत्या. चित्रपटात संजीव कुमार मुख्य भुमिकेत होते. सुरुवातील त्यांना या चित्रपटात रुची नव्हती. त्यांना चित्रपटाची स्किप्ट आवडली नव्हती. पण चित्रपटासाठी दिलीप कुमारने त्यांचे नाव सुचवले होते. म्हणून त्यांनी चित्रपटाला होकार दिला होता.

खास गोष्ट म्हणजे चित्रपटात संजीव कुमार नऊ वेगवेगळ्या भुमिकेत दिसले होते. याच कारणामूळे त्याकाळी चित्रपटाची चर्चा खुप जास्त रंगली होती. संजीव कुमार रोज नवनवीन रुपात दिसायचे. ज्यामूळे त्यांना ओळखणे देखील कठिण होते.

चित्रपटातील एका पात्रासाठी संजीव कुमारला भिकारी बनायचे होते. म्हणून हॉटेलवर भिकाऱ्याचे सगळे मेकअप केले आणि मग सेटवर जाण्याचा निर्णय घेतला. संजीव कुमारचे मेकअप पाहून त्यांना ओळखणेही कठिण झाले होते. त्यांचे मेकअप करणारी मानस त्यांना ओळखू शकत होती.

अशाच मेकअपमध्ये संजीव कुमारने सेटवर जाण्याचा निर्णय घेतला. सेटवर पोहोचताच त्यांनी पाहीले की, चित्रपटाच्या अभिनेत्री जया बच्चन एका झाडाखाली खुर्ची टाकून बसल्या आहेत. त्यांना तसे पाहून संजीव कुमारच्या डोक्यात आयडिया आली आणि त्यांनी जया बच्चनला त्रास द्यायचे ठरवले.

संजीव कुमार भिकाऱ्या अवस्थेत जया बच्चनकडे गेले आणि त्यांनी भिक मागायला सुरुवात केली. जया बच्चनने कितीही सांगितले तरी संजीव कुमार ऐकत नव्हते. ते जया बच्चनच्या मागेच लागले. भिकाऱ्याला सेटवर बघून त्या खुप जास्त चिडल्या. भिकारी आपलं ऐकत नाही हे बघून तर त्यांचा राग अनावर झाला.

संजीव कुमारने जया बच्चनचे पाय पकडून भिक मागू लागले. हे पाहताच त्यांनी ओरडायला सुरुवात केली आणि सेटवरील लोकांना बोलावले. जया बच्चनने भिकारी बनलेल्या संजीव कुमारला सेटवरुन बाहेर काढायला सांगितले. सेटवरील लोकांनी त्यांना हात पकडून सेटवर बाहेर काढायला सुरुवात केली.

त्यावेळी संजीव कुमारने सांगितले की, ते संजीव आहेत आणि चित्रपटासाठी त्यांनी भिकाऱ्याची वेशभुषा घेतली आहे. पण तरीही लोकांना विश्वास बसत नव्हता की, हे संजीव कुमार आहेत. शेवटी जया बच्चन आणि चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या सांगण्यावरुन लोकांनी संजीव कुमारला सेटवरुन बाहेर काढले नाही.

महत्वाच्या बातम्या –
अभिनेत्री रेखा शारीरीक संबंधावर असे काही म्हणाल्या की, लोकांनी दिल्या शिव्या
‘हम आपके है कौन’ चित्रपटातील रिटाची आज झाली आहे ‘अशी’ अवस्था; पहा फोटो
९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री रंभाची आता झालीये अशी अवस्था, वाचून धक्का बसेल
लवकर लग्न करून सेटल व्हायचंय; पण…आशुतोषसोबतच्या नात्यावर तेजश्री प्रधानची प्रतिक्रिया

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.