Share

martyred : “हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात…”; शहीद जवानाला निरोप देताना भावाचे काटा आणणारे भाषण

martyred : २४ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील उधमपूरच्या दुडू-बसंतगड भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराच्या ६ पॅरा स्पेशल फोर्सेसचे जवान हवालदार झंटू अली शेख शहीद(martyred) झाले. त्यांच्या शौर्याला सलाम करत पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात त्यांच्या मूळ गावी शनिवारी लष्करी सन्मानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंत्यसंस्कारावेळी लष्कराने हवेत तीन वेळा गोळीबार करीत मानवंदना दिली. गावकऱ्यांनी “हिंदुस्तान जिंदाबाद”च्या घोषणांनी परिसर दणाणवून टाकला. यावेळी झंटू अली शेख यांचे मोठे भाऊ सुभेदार रफिकुर अली शेख यांनी केलेले भाषण विशेष चर्चेचा विषय ठरले आहे.

“देश प्रथम, मग कुटुंब” — रफिकुर अली शेख यांचे हृदयस्पर्शी उद्गार

रफिकुर अली शेख म्हणाले, “दहशतवाद्यांनी माझ्या भावावर मागून हल्ला केला. आम्ही त्याच्या बलिदानाचा बदला घेऊ किंवा मरण पत्करू. माझ्या भावाला दोन मुले आहेत, त्यांच्या भविष्याची काळजी घ्या. आम्हाला दुःख आहे, पण त्याचबरोबर अभिमानही आहे की झंटूने देशासाठी प्राण अर्पण केला. लाखो लोकांमध्ये काहींनाच देशासाठी शहीद(martyred) होण्याचा मान मिळतो.”

ते पुढे म्हणाले, “मी माझ्या भावाच्या मुलांनाही सैन्यात पाठवण्याचा प्रयत्न करेन. माझ्यासाठी देश सर्वप्रथम आहे. भारतीय सैन्य हे धर्म, जात, पंथ या सगळ्यापेक्षा मोठं आहे. आम्ही एकाच ताटात जेवतो, आम्ही भारतीय आहोत, सैनिक आहोत. बंधुतेचं खरं स्वरूप पाहायचं असेल, तर सैन्यात येऊन पहा.”

शौर्याला मानाची सलामी

शहीद(martyred) झंटू अली शेख यांच्या अंतिम यात्रेला मोठ्या संख्येने नागरिक, स्थानिक प्रशासन आणि लष्करी अधिकारी उपस्थित होते. त्यांच्या बलिदानाने केवळ नादिया जिल्हा नव्हे तर संपूर्ण देशाचा अभिमान वाढवला आहे.
jawan-havaldar-zantu-ali-shaikh-was-martyred

 

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now