मां मै जल्दी वापस लौटूंगा..; शहीद जवानाची कहाणी ऐकून डोळ्यांत पाणी येईल

मुंबई : छत्तीसगढच्या बिजापूर येथील जंगलात शनिवारी नक्षलवादी आणि भारतीय जवानांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. या चकमकीत २२ भारतीय जवान शहीद झाले. तर ३१ जवान जखमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय सुरक्षादलांवर नक्षलवाद्यांकडून झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे.

या हल्ल्यात उत्तर प्रदेशच्या चंदोली येथील वीर जवान धर्मदेव कुमार हे शहीद झाले. धर्मदेव सीआरपीएफच्या स्पेशल ग्रूपच्या कोब्रा बटालियनमध्ये कमांडो पदावर कार्यरत होते. २०१३ साली त्यांची सीआरपीएफमध्ये निवड झाली होती.

रविवारी रात्री उशिरा त्यांच्या कुटुंबियांना धर्मदेव शहीद झाल्याची माहिती मिळाली. धर्मदेव शहीद झाल्याचे कळताच कुटुंबासह संपूर्ण शाहबगंजमध्ये शोककळा पसरली. धर्मदेवच्या घरी गावातील नागरिक जमा होऊ लागले.

मार्च महिन्यात धर्मदेव हे सुटीसाठी घरी परतले होते. होळीच्या १० दिवस आधी सुटी संपवून ते पुन्हा सेवेत रुजू होण्यासाठी निघाले होते. पुन्हा ड्युटीवर जाण्यासाठी निघताना मी लवकरच परत येईन, असे वचन देखील  धर्मदेव यांनी आपल्या कुटुंबियांना दिलं होतं. पण काल त्यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण गाव सुन्न झालं.

दरम्यान, धर्मदेव यांना लहानपणापासून देशाच्या सेवेसाठी लष्करातच भरती व्हायचं होतं, असं धर्मदेव यांचे वडील रामाश्रय गुप्ता यांनी सांगितले. धर्मदेव यांच्या जाण्यानं त्यांच्या दोन मुली साक्षी आणि ज्योती यांच्या डोक्यावरचं छत्र हरवलंय. धर्मदेव यांच्या पत्नी मीना गर्भवती देखील आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

‘लॉकडाऊन हे राजकीय हत्यार, १०० कोटींसह इतर प्रश्न कोणी विचारू नयेत म्हणून लॉकडाऊन’

एका विवाहित पुरुषाच्यामागे झाली होती वेडी, रेखा यांनी दिली कबुली; म्हणाल्या…

शरद पवारांचे पीए ते महाराष्ट्राचे गृहमंत्री; दिलीप वळसे पाटलांचा थक्क करणारा राजकीय प्रवास

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.