जावेद अख्तरांचा शाहरूखला पाठींबा; म्हणाले, सेलिब्रीटींवर चिखल उडवण्यात सर्वांना मजा येते, म्हणून..

मुंबई। बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने ताब्यात घेतल्यानंतर संपूर्ण बॉलीवूड हादरल. काहींनी आर्यन खानवर जोरदार टीका केली. तर काहींनी त्याला पाठिंबा दिला आहे.

दरम्यान आता प्रसिद्ध संगीतकार तथा गीतकार जावेद अख्तर यांनी शाहरुख खान व त्यांच्या मुलाला पाठींबा दिला आहे.मुंबईत चेंजमेकर्स या पुस्तकाचं प्रकाशन जावेद अख्तर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी जावेद अख्तर यांनी हे वक्तव्य केलं आहे. सेलिब्रेटी असल्यानं शाहरुखला त्रासाला सामोरे जावं लागत असल्याचही अख्तर यांनी टीपण्णी केलीय.

आर्यनकडे या प्रकरणाशी संबंधीत काहीच पुरावे सापडलेले नाही. मात्र त्याच्या मित्रांकडे ड्रग्स सापडलं आहे. अशा परिस्थितीत अनेकांच्या मनात प्रश्न उभे राहिलेत की, आर्यन खानला का सोडलं जात नाही? आर्यन खानच्या अटकेमुळे शाहरूख खानच्या संकटात वाढ होत आहे.

अगदी त्याला आपली शुटिंग देखील सोडावी लागली. सुपरस्टार अनेक संकटांना सामोर जात आहे. आता ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर शाहरूख खानच्या मुलाच्या समर्थानाथ समोर आले आहेत. अख्तर पुढे म्हणाले,बॉलिवूडला उच्च स्थानी असल्याची किंमत मोजवी लागणार आहे.

अल्पसंख्याकांविरोधात होणारा अन्याय बघून मी चिंता व्यक्त करतो. अशा घटना बांगलादेशात जास्त घडतात. हसीना शेखची ओळख एक उदारवादी नेता म्हणून झाली होती. अशा घटना भारतात होऊदेत किंवा भारताबाहेर ही एक चिंतेची बाब आहे.

पुढे ते म्हणाले, ,’मी पोर्टवर पकडण्यात आलेल्या 1 बिलियन डॉलर कोकीनबाबत एकही बातमी पाहिली नाही. मात्र 1.30 लाख चरस गांजा पकडल्याची बातमी नॅशनल न्यूज होते. फिल्म इंडस्ट्री हाय प्रोफाईल असल्यामुळे ही शिक्षा भोगत आहे.’ जावेद अख्तर कायमच आपल्या स्ष्ट बोलण्यामुळे चर्चेत असतात.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.