कंगणा राणावत हाजीर हो; ‘या’प्रकरणात पुन्हा अडकली वादाची राणी

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणावत तिच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. त्या वक्तव्यांमुळे तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. आताही ती अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. जावेद अख्तर यांच्याविषयी मुलाखतीत वक्तव्य केल्यामुळे जावेद अख्तर यांनी कंगना विरूद्ध मानहानीचा दावा दाखल केला आहे.

जावेद अख्तर यांनी केलेल्या फौजदारी मानहानी दाव्याप्रकरणी दंडाधिकारी न्यायालयाने बॉलिवूड अभिनेत्री कंगनाला सोमवारी नोटीस बजावली आहे. दंडाधिकारी आर. आर. खान यांनी या प्रकरणी जुहू पोलिसांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार पोलिसांनी सोमवारी न्यायालयात अहवाल सादर केला. कंगनावर केलेल्या आरोपांत तथ्य असल्याने आणखी तपास करावा लागेल, असे पोलिसांनी अहवालात म्हटल्याचे जावेद यांचे वकील कुमार भारद्वाज यांनी न्यायालयाला सांगितले आहे.

दरम्यान, अख्तर यांनी केलेल्या दाव्यानुसार कंगनाने माझ्याबद्दल निराधार वक्तव्ये केली असून यामुळे माझ्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे, असे अख्तर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाशी संबंधित वादात कंगनाने माझे नाव नाहक ओढले, असा आरोपही अख्तर यांनी केला आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्म.हत्या प्रकरणात कंगनाने रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये जावेद यांचाही उल्लेख केला होता. “एकदा जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलवून सांगितले होते की, राकेश रोशन आणि त्यांचे कुटुंबीय खूप मोठे लोक आहेत. तू जर त्यांच्याविरोधात माफी मागितली नाही तर तुझे नुकसान होईल. ते तुला जेलमध्ये टाकतील. त्यावेळी तुझ्या हातात काहीच राहणार नाही. त्यावेळी तुला आत्महत्या करावी लागेल,” असे कंगणा म्हणाली होती.

महत्त्वाच्या बातम्या
…अन् मध्यरात्री नाईट ड्रेसमध्येच नागरिक आले कोरोना लस घ्यायला; कारण वाचून बसेल धक्का
पतंजली देणार पाच लाख तरुणांना रोजगार; बाबा रामदेव यांची घोषणा
‘मोदी सरकार म्हणजे खिशात नाही आणा अन् बाजीराव म्हणा…’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.