कंगणा सापडणार पुन्हा अडचणीत; जावेद अख्तर यांनी कंगणाविरूद्ध दाखल केला मानहानीचा दावा

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणावत तिच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. त्या वक्तव्यांमुळे तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. आताही ती अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. जावेद अख्तर यांच्याविषयी मुलाखतीत वक्तव्य केल्यामुळे जावेद अख्तर यांनी कंगना रनौत यांच्याविरूद्ध मानहानीचा दावा दाखल केला आहे.

कंगनाने माझ्याबद्दल निराधार वक्तव्ये केली असून यामुळे माझ्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे, असे अख्तर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाशी संबंधित वादात कंगनाने माझे नाव नाहक ओढले, असा आरोपही अख्तर यांनी केला आहे.

ऋतिक रोशन प्रकरणात माफी मागण्यासाठी घरी बोलावून दमदाटी केल्याचा धादांत खोटा आरोपही तिने माझ्यावर केला असून या सर्वाची गंभीर दखल घेतली. त्यानुसार कंगनावर आयपीसी कलम ४९९ आणि ५०० नुसार अब्रुनुकसान केल्याचा खटलाही दाखल करण्याची मागणी जावेद अख्तर यांनी कोर्टाकडे केली आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्म.हत्या प्रकरणात कंगनाने रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये जावेद यांचाही उल्लेख केला होता. “एकदा जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलवून सांगितले होते की, राकेश रोशन आणि त्यांचे कुटुंबीय खूप मोठे लोक आहेत. तू जर त्यांच्याविरोधात माफी मागितली नाही तर तुझे नुकसान होईल. ते तुला जेलमध्ये टाकतील. त्यावेळी तुझ्या हातात काहीच राहणार नाही. त्यावेळी तुला आत्महत्या करावी लागेल,” असे कंगणा म्हणाली होती.

“त्यांना असे का वाटते की, मी जर ऋतिक रोशनची माफी नाही मागितली तर मला आत्महत्या करावी लागेल. ते माझ्यावर इतक्या जोरात ओरडले होते की माझे पाय कापयला लागले होते”, अशी कंगना त्या मुलाखतीत म्हणाली होती.

महत्त्वाच्या बातम्या

अर्णब अटक! कंगना – ठाकरे सरकारमध्ये जुंपली

चिनी मोबाईल कंपन्यांना आपला स्वदेशी मायक्रोमॅक्स देणार टक्कर; दोन स्मार्टफोन लॉन्च

‘महाराष्ट्राच्या सातबारावर दिल्लीचे नाव कोणी लावले? मुंबईची इंच इंच जमीन महाराष्ट्राचीच‘

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.