झाला खुलासा! ‘या’ अभिनेत्रीचं बुमराह-संजनाच्या लग्नावर शिक्कामोर्तब

मुंबई : भारतीय संघाचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराह कुणाशी लग्न करणार, या प्रश्नाचं उत्तरं अखेर मिळालं आहे. यासाठी त्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यापूर्वी जसप्रितनं सुट्टी घेतली. त्यानं ही सुट्टी लग्नासाठी घेतल्याचे वृत्त नंतर समोर आलं.

तेव्हापासून जसप्रितची होणारी पत्नी कोण, या चर्चेत दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमना परमेश्वरन हिचं नाव आघाडीवर होतं. पण, अनुपमाच्या आईनं हे वृत्त फेटाळून लावल्यानं पुन्हा जसप्रीतची होणारी पत्नी कोण या चर्चांनी जोर धरला. अखेर आता बुमराह-संजनाच्या लग्नावर शिक्कामोर्तब झाला आहे.

याबाबत बॉलीवूड अभिनेत्री तारा शर्माने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून बुमराह आणि संजनाच्या लग्नावर शिक्कामोर्तब केले आहे. पोस्टमध्ये शर्माने म्हंटले आहे की, ‘जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांना त्यांच्या होणाऱ्या लग्नाबद्दल अभिनंदन. आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.’

तसेच तारा शर्मा शोमध्ये आल्याबद्दल जसप्रीत बुमराहचे धन्यवाद. सहाव्या मोसमात तुम्ही दोघं एकत्र या शोसाठी याल, अशी अपेक्षा,’ अशी इन्स्टाग्राम पोस्ट तारा शर्माने लिहिली आहे. सोबतच पोस्टमध्ये तारा शर्माने बुमराह आणि तिच्या दोन मुलांसोबतचा फोटो पोस्ट केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

नादच खुळा! शेतकऱ्याचा मुलगा बनला पोलिस उपनिरीक्षक, पुर्ण गावाने केलं जंगी स्वागत

फक्त एमएच ०९! पठ्ठ्याने न्यु जर्सीत विकत घेतली कोल्हापुरची नंबर प्लेट

भन्नाट इलेक्ट्रिक सायकल, अवघ्या ५० रुपयात चालते १००० किलोमीटर; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.