अखेर ठरलं! बुमराह-संजनाच्या लग्नावर शिक्कामोर्तब; ‘या’ अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल

मुंबई : भारतीय संघाचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराह अखेर लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. काही दिवसांपूर्वी जसप्रितची होणारी पत्नी कोण, या चर्चेत दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमना परमेश्वरन हिचं नाव आघाडीवर होतं. पण, अनुपमाच्या आईनं हे वृत्त फेटाळून लावल्यानं पुन्हा जसप्रीतची होणारी पत्नी कोण या चर्चांनी जोर धरला.

अखेर आता बुमराह-संजनाच्या लग्नावर शिक्कामोर्तब झाला आहे. याबाबत बॉलीवूड अभिनेत्री तारा शर्माने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून बुमराह आणि संजनाच्या लग्नावर शिक्कामोर्तब केले आहे.

पोस्टमध्ये शर्माने म्हंटले आहे की, ‘जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांना त्यांच्या होणाऱ्या लग्नाबद्दल अभिनंदन. आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.’

तसेच तारा शर्मा शोमध्ये आल्याबद्दल जसप्रीत बुमराहचे धन्यवाद. सहाव्या मोसमात तुम्ही दोघं एकत्र या शोसाठी याल, अशी अपेक्षा,’ अशी इन्स्टाग्राम पोस्ट तारा शर्माने लिहिली आहे. सोबतच पोस्टमध्ये तारा शर्माने बुमराह आणि तिच्या दोन मुलांसोबतचा फोटो पोस्ट केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

…म्हणून प्रियंका चोप्राने दोन चित्रपटांनंतर सलमान खानसोबत काम केले नाही

दाभोळकर आणि पानसरेंच्या प्रकरणावरून हायकोर्टाने तपास यंत्रणांना खडसावले, म्हणाले…

एकाचवेळी ४ मुलांसोबत मुलीचं होतं लफडं, बापाला समजताच घडला ‘हा’ प्रकार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.