जसप्रित बुमराह अडकला विवाहबंधनात, पहा त्याच्या लग्नातील सुंदर फोटो

मुंबई | भारतीय संघाचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराह अखेर लग्नाच्या बेडीत अडकला आहे. त्याच्या लग्नातील फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अनेक दिवसांपासुन बुमराह कोणासोबत लग्न करणार याबाबतच्या चर्चांना उधाण आले होते. आता त्याच्या लग्न सोहळ्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

जसप्रित बुमराहने स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेशन हिच्यासोबत सात फेरे घेतले आहेत. त्यांचे लग्नाआधीचे सर्व समारंभ रविवारी पार पडले तर आज (सोमवारी) लग्न झाले आहे. त्यांच्या लग्नाला फक्त २० लोकांची उपस्थिती होती. याशिवाय त्यांना मोबाईल सोबत राखण्यास मनाई करण्यात आली होती.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी जसप्रितची होणारी पत्नी कोण होणार, या चर्चेत दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमना परमेश्वरन हिचं नाव आघाडीवर होतं. यानंतर अनुपमाच्या आईनं हे वृत्त फेटाळून लावल्यानं पुन्हा जसप्रीतची होणारी पत्नी कोण या चर्चांनी जोर धरला.

लग्नाचे फोटो बुमराहने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. आता त्याच्या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर सर्व चर्चांवर पुर्णविराम लागला आहे. चाहत्यांनी बुमराहला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

फोटो शेअर करताना बुमराहने खास कॅप्शन दिले आहे. यामध्ये तो म्हणतो, प्रेम, जर योग्य असेल, तर आपल्याला योग्य मार्ग दाखवतं, आम्ही दोघं नवीन प्रवास सुरू करत आहोत. आजचा दिवस हा माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात आनंदाचा आहे. या नव्या प्रवासाची बातमी तुमच्यासोबत शेअर करताना स्वत:ला भाग्यवान समजतो. हा आनंद तुमच्याशिवाय अपूरा आहे.

बुमराहची पत्नी संजानाचा जन्म ६ मे १९९१ रोजी महाराष्ट्रातील पुणे शहरात झाला आहे. ती आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्सची शो नाईट क्लबची होस्ट होती. याशिवाय संजनाने आयपीएल लिलावाचे होस्ट म्हणून काम केले आहे. क्रिकेट वर्ल्डकप स्पेर्धेचे होस्ट म्हणूनही तिने काम केले आहे.

महत्वाच्या बातम्या-
जसप्रीत बुमराहला राग अनावर; मैदानात असं काय केल जे तुम्ही पाहिले नसेल
साऊथच्या ‘या’ अभिनेत्रीला करायचे आहे जसप्रीत बुमराहसोबत लग्न; म्हणते मी त्याच्यासाठी काहीही करेन…
साऊथ इंडस्ट्रीतील ‘ही’ अभिनेत्री होणार बुमराहची नवरी? अभिनेत्रीने घेतली लग्नासाठी सुट्टी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.