जसप्रीत बुमराहच्या मुंबईतील नवीन घराचे फोटो पाहिलेत? आलिशान घरातील सुविधा बघून थक्क व्हाल

मुंबई । भारतीय क्रिकेट संघाचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह अगदी कमी कालावधीमध्ये लोकप्रिय झाला. आता टीमचा तो एक प्रमुख गोलंदाज झाला आहे. त्याने काही महिन्यांपूर्वीच लग्न देखील केले आहे. त्याच्या लग्नाची देखील बरीच चर्चा झाली होती. बुमराहने नुकतेच मुंबईत एक आलीशान घर घेतले आहे.

यामुळे आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जसप्रीत बुमराहच्या घराच्या भिंती आणि फर्निचर अतिशय सुंदर आहेत. याला हलक्या रंगाची सजावट आहे. घराचा कलर देखील साधा पण खूपच भारी आहे. तो मैदानावर कठोर परिश्रम करण्यासाठी ओळखला जातो. अनेक महत्त्वाच्या सामन्यात तो निर्णायक विकेट घेतो.

यासाठी विश्रांतीसाठी त्याच्या घरात एक मनोरंजनाची खोली आहे. जिथे तो बऱ्याचदा रिकामा वेळ घालवतो. या खोलीत बसून त्याला व्हिडिओ गेम खेळायला आवडते. आणि तो खेळतो देखील. यासाठी खास ही रूम तयार करण्यात आली आहे.

जसप्रीत बुमराहला त्याची खोली स्वच्छ ठेवणे आवडते, तो कोणत्याही प्रकारचा अस्वच्छता ठेवत नाही. तो स्वतः खोली साफ करतो. सगळं टापटीप ठेवायला त्याला आवडते. त्याच्या बेडरूममध्ये लाकडी फ्लोअरिंग करण्यात आले आहे.

या खोलीच्या दारावर एक निळा स्लाइडर आहे. तसेच त्याच्या घराला मोठी बाल्कनी आहे. यामध्ये अनेक झाडे आहेत. जसप्रीत बुमराहला आपली बाल्कनी हिरवी ठेवणे आवडते. तो स्वतः या झाडांची काळजी घेतो. त्यांना पाणी घालून निगा राखतो. त्याच्याकडे अनेक प्रकारची झाडे आहेत.

इथे त्याने अनेक भांडी ठेवली आहेत. यासोबतच विंड चाइम्स देखील या ठिकाणाच्या सौंदर्यात भर घालतात. तो या घरात कुटूंबासोबत राहतो. त्याच्या या घराचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.