जास्मीन भसीनने अशी केली आत्महत्येच्या विचारांवर मात; जाणून घ्या तिच्या कठीण प्रसंगांविषयी

‘बिग बॉस १४’ स्पर्धक अभिनेत्री जास्मीन भसीन सध्या सोशल मिडीयावर खूप अ‍ॅक्टिव असते. तिच्या चाहत्यांसाठी ती सतत फोटोज आणि व्हिडीओ शेअर करत असते. जास्मीन भसीन आपल्याला नुकत्याच झालेल्या ‘बिग बॉस१४’ मध्ये पाहायला मिळाली. त्यात तिने आपल्या आयुष्यातील अनेक किस्से शेअर केले होते. ‘बिग बॉस १४’ मध्ये ती चाहत्यांच्या आवडत्या स्पर्धकांपैकी एक होती.

जास्मीनने बिग बॉस मध्ये आपल्या आयुष्यातील अनेक खुलासे केले आहे. त्यात तिने सांगितले की, करीयरच्या सुरवातीच्या काळात तिला कामासाठी बऱ्याचठिकाणाहून नकार पत्करावा लागला, एकापाठोपाठ नकार पचवणे तिला अवघड जावू लागले आणि तिच्या मनात आत्महत्येचा विचार घोळू लागला. स्वतः मध्ये अनेक त्रुटीआहेत असे तिला जाणवू लागले.या विचारांनी ती खचली होती.

मिडीयाला दिलेल्या एका मुलाखतीत जास्मीन म्हणाली की, मी करीयरच्या सुरवातीच्या काळात अनेक कठीण प्रसंगातून जात होते. हा तोच काळ होता जेव्हा मी मुंबईला येऊन स्ट्रगल करायला सुरुवात केली होती. माझी लढाई कुठेतरी माझ्याशीच होती, मीच माझा आत्मविश्वास वाढवू शकत नव्हते, असे मला रोज जाणवत असे. रोजच्या नाकारणे मीच माझ्यातले दोष शोधत होते.

या नकारात्मक भावनातून बाहेर पडण्यासाठी जास्मीनने ठरवल आधी स्वतःवर प्रेम करायचं. हीच गोष्ट तिच्यासाठी महत्वाची ठरली. यातून ती एक महत्वाची गोष्ट शिकली ती म्हणजे ‘आपल्याला स्वतःला जसे आहोत तसे स्वीकारता आले पाहिजे’. जास्मीन म्हणते, आपल्याला आपले दोष स्वीकारता आले पाहिजे ज्यामुळे आपल्याला समजते की आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत.

पुढे जाऊन जास्मीन बोलते की, आपण स्वतःला सिद्ध केले पाहिजे नाहीतर खेळण्यांच्या दुकानात ठेवलेल्या बाहुल्यासारखे दिसू. मी स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप प्रयत्न करेन,मी माझा १०० टक्के देईन, जेणेकरून मी प्रयत्न केला नाही असा दोष मला वाटू नये. अश्या वेळी कुठलीही गोष्ट मिळण्याच्या मार्गात आपल्याला कोणताही अडथळा येणार नाही.

जास्मीनने ‘बिग बॉस १४ ‘ आणि ‘खतरों के खिलाडी’९ या रियालिटी शोमध्ये काम केले. तसेच ती ‘खतरों के खिलाडी’ मेड इन इंडिया या या रियालिटी शो मध्ये देखील दिसली होती. तसेच जस्मिनने ‘टशन-ए-इश्क’, ‘दिल से दिल तक’, ‘नागिन’ यासारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. जस्मिन तिचा प्रियकर अली गोनीसोबत ‘तेरा सूट’ आणि ‘टू भी सताया जायेगा’ या दोन व्हिडीओमध्ये दिसली. या दोनही व्हिडीओला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले.

हे ही वाचा-

पुरुषांसाठी वरदान आहे उडीद डाळ; एनर्जी बुस्ट, रक्तभिसरण सारख्या समस्यांवर रामबाण उपाय

लक्ष्याच्या आठवणीत भावूक झाले अशोक मामा, लावला थेट लक्ष्याला फोन; पहा व्हिडीओ

पंढरपुरच्या निवडणूकीचे हादरे नांदेडपर्यंत; तीनवेळा आमदार झालेला शिवसेना नेता भाजपच्या वाटेवर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.