भारतीय वंशाच्या जसकरणाने ठोकले सहा बॉलात सहा सिक्स अन् रचला इतिहास; व्हिडिओ होतोय व्हायरल

क्रिकेट खेळत असताना षटकार अशी प्रत्येक फलंदाजाची इच्छा असते. कारण एका षटकाएरानेही पुर्ण सामना पलटू शकतो. क्रिकेटच्या इतिहासात असे मोजकेच फलंदाज आहे, ज्यांनी एका ओव्हरमध्ये सहा षटकार मारलेत.

एका ओव्हरमध्ये ६ षटकार मारणाऱ्यांमध्ये सर्वात पहिले नाव दक्षिण आफ्रिकेच्या हर्शल गिब्सचे येते. २००७ सालच्या विश्वचषकात नेदरलँड विरुद्धच्या सामन्यात गिब्सने सहा षटकार ठोकले होते, त्यानंतर भारतीय खेळाडू युवराज सिंहने टी २० विश्वचषकात इंग्लंडच्या स्टुवर्ट ब्रॉडला सहा षटकार ठोकले होते.

आता सहा षटकार ठोकणाऱ्यांच्या यादीमध्ये आणखी एका भारतीयाचे नाव जोडले गेले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात सहा षटकार ठोकणाऱ्या या खेळाडूचे नाव जसकरण मल्होत्रा आहे. पण हा भारतीय भारतासाठी नाही, तर अमेरिकेच्या संघासाठी क्रिकेट खेळत आहे.

चंदीगड शहरात जन्मलेल्या ३२ वर्षाचा जसकरण अमेरिका क्रिकेट संघाचा फलंदाज आहे. अमेरिका गुरुवारी अमेरिका विरुद्ध पापुआ न्यु गिनी संघाविरुद्ध सामन्यात जसकरणने एका ओव्हरमध्ये सहा षटकार मारले आहे.

तसेच एकदिवसीय सामन्यात अशाप्रकारची कामगिरी करणारा जसकरण हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. या सामन्यात जसकरणने १२४ चेंडूत १७३ धावा केल्या आहे. या धडाकेबाज खेळीत त्याने १६ षटकार आणि ४ चौकार मारले आहे. सध्या जसकरणच्या षटकारांचा एक व्हिडिओही समोर आला आहे.

दरम्यान, या सामन्या अमेरिका विजयी ठरला आहे. अमेरिकेने पहिले फलंदाजी करत पापुआ न्यु गिनी या संघासमोर २७२ लक्ष ठेवले होते. पण पीएनजीच्या संघाला फक्त १३४ धावाच करता आल्या कारण त्यांचे सर्व खेळाडू बाद झाले होते. अमेरिकेला विजय मिळवून देण्यामध्ये जसकरणने महत्वाची भुमिका बजावली आहे.

 महत्वाच्या बातम्या-

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातांचे आणि पायांचे ठसे असलेला किल्ला; वाचा त्या किल्ल्याबद्दल..
आम्ही आता बदललो म्हणणाऱ्या तालिबानने पुन्हा दाखवली क्रुरता; सत्य समोर आणणाऱ्या पत्रकारांना बेदम मारहाण
दुखा:त बुडालेल्या अक्षयच्या सांत्वनासाठी शिल्पा शेट्टी, करण जोहरसह बाॅलीवूड कलाकारांची रीघ

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.