गावठी मुलाच्या डान्सने वेड लावले जान्हवी कपूरला, फिदा होत म्हणाली माझ्यासोबत एक दिवस घालवशील का?

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. यामध्ये ती चक्क एका डान्सर तरूणाला पाहून त्याच्या प्रेमात पडली. आणि तिने लगेच त्याला डेटसाठीही विचारलं. यावर तरुणाने तिला होकार दिला. आणि यादरम्यानचा दोघांच्या डेटिंगचा भन्नाट व्हिडीओ भलताच व्हायरल झाला.

त्याच झालं असं की, जान्हवी कपूर तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी डान्स दिवाने या रिअलिटी शोमध्ये पोहोचली होती. यावेळी शोमध्ये पियुष नावाच्या तरुणाने जबरदस्त डान्स केला. त्याचा डान्स पाहून समोर बसलेले परिक्षक थक्क झाले.

पियुषच्या डान्सचे परिक्षकांनी विशेष कौतुक केले. परंतु जान्हवी कपूरने पियुषचा डान्स पाहून त्याला थेट डेटसाठीच विचारले. स्वत: जान्हवीचा असा प्रश्न ऐकून पियुषचा आनंद गगनात मावत नव्हता. त्याने कुठलाही विचार न करता लगेच होकार दिला.

हा व्हिडीओ कलर्स वाहिनीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. या भन्नाट व्हिडीओत डान्स दिवाने शोमध्ये चांगलीच मस्ती झाल्याचे पाहायला मिळत आहे. पियुषचा डान्स आणि नतंर जान्हवीसोबतची त्याची डेट सोशल मीडियावर चांगलीच पसंत केली जात आहे.

दरम्यान, जान्हवीचा ‘रुही’ हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजय यांनी केली आहे. या चित्रपटात जान्हवीसोबत राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, रोनित रॉय या कलाकारांनी महत्वाची भूमिका साकारल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-
नक्की कोण आहे ‘कारभारी लयभारी’ मालिकेत मुख्य अभिनेत्याची भुमिका निभावणारा कलाकार
तैमूर गाडीतून उतरताच भडकला, आणि थेट काचेवर जाऊन धडकला, पाहा व्हिडिओ
प्रियंका चोप्राने ट्रान्सपरंट ड्रेस घालून उडवली चाहत्यांची झोप; पहा फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.