कंगणाने आता घेतला थेट टाटांशी पंगा; लव्ह जिहादच्या मुद्यावर भिडली

सध्या सोशल मीडियावर बजाज कंपनीचा ब्रँड तनिष्क चांगलाच वादाच्या भवऱ्यात अडकला आहे. कारण तनिष्क ब्रँडच्या नवीन जाहिरातीवर लोकांनी आक्षेप घेतला आहे. लोकांनी या जाहिरातीवर लव्ह जिहादचा प्रसार केल्याचा आरोप केला आहे.

या जाहीरातीमध्ये दाखवण्यात आले आहे की, एक हिंदू कुटुंबातील मुलगी लग्न करून मुस्लिम कुटुंबात जाते. सासरचे लोक हिंदू पद्धतीने बारसे करण्याचा निर्णय घेतला. मुलीच्या आनंदासाठी तिच्या सासरच्यांनी बारसे करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन धर्म आणि परंपराचा मेळ साधण्याचा प्रयत्न तनिष्कने केला आहे. परंतु लोकांना ही जाहिरात आवडली नाही. अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी याच्यावर आक्षेप घेतला आहे. त्यानंतर ट्विटरवर #BoycottTanishq हा ट्रेंड सुरू झाला होता.

आत्ता या सर्व प्रकरणात बॉलीवूडची क्वीन कंगना राणावतने तिचे मत व्यक्त केले आहे. कंगना ट्विट करता म्हणाली की, ‘जाहिरात चुकीची नव्हती. पण त्याची अंबलबजावणी चुकीची होती. हिंदू धर्माच्या मुलीचे लग्न मुस्लिम कुटुंबात झाले. ती तिच्या सासूला हळू आवाजात विचारत आहे की, ही विधी इथे मानली जात नाही मग तरी का होत आहे? तिला ते विचारण्याची गरज का पडली? ती स्वत: च्या घरात इतकी घाबरलेली का दिसत आहे? लाजिरवाणे.’

कंगनाने पुढे ट्विट केले की, ‘एक हिंदू म्हणून आपल्याला नेहमीच सतर्क राहणे गरजेचे आहे. कारण हे क्रिएटिव्ह दहशतवादी आपल्या मनात चुकीच्या गोष्टी घालवत आहेत. आपल्याला या गोष्टीचा परिणाम, परीक्षण आणि या गोष्टीचा आपल्यावर किती परिणाम होतो जे जाणून घेतले पाहिजे. आपली संस्कृती वाचवण्याचा हा एकमेव मार्ग आहे’.

कंगना इथेच थांबली नाही. ती म्हणाली की, ‘ही जाहिरात अनेक प्रकारे चुकीची आहे. ती मुलगी बऱ्याच दिवसांपासून त्या घरात राहत आहे. पण जेव्हा ती त्या घराला वारस देणार असते तेव्हा तिला स्वीकारले जाते. ही जाहिरात फक्त जिहादलाच प्रोमोट करत नाही तर लिंगभेदालाही प्रोत्साहन देते’.

महत्त्वाच्या बातम्या –

सुशांत प्रकरणात आता रितेश देशमुखची उडी; रियाला दिला उघड पाठिंबा देत म्हणाला..

भाजपला खिंडार! एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित

अमेरीकेतील लाखोंची नोकरी सोडून आली शेती करायला, आज मोठमोठ्या हाॅटेल्सला जातात उत्पादने

‘आपले आयुष्य उध्वस्त केले’, रिया तुरुंगातून घरी येताच रियाच्या आईने दिली पहिली प्रतिक्रिया

वावर एकरभर आणि उत्पन्न लाखांवर; वाचा काय टेक्निक वापरलंय या शेतकऱ्याने

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.