जमशेदजी टाटा ठरले जगातील सर्वाधिक दानशूर व्यक्ती, १०० वर्षांत केले येवढे दान, जाणून घ्या…

मुंबई । टाटा कुटूंब म्हटले की समोर एक देशप्रेमी उभा राहतो. देशावर संकट आले की टाटा यांचे नाव निघतेच. आता टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांनी १८९२ पासून दिलेल्या मोठ्या देणग्यांचा या हुरुन रिपोर्टमध्ये समावेश करण्यात आला आहे.

दानशूर लोकांच्या यादीमध्ये टाटा यांनी बिल गेट्स, वॉरेन बफे यांनादेखील मागे टाकले आहे. हुरुन रिपोर्ट आणि एडेलगिव फाउंडेशनच्या वतीने दान करणाऱ्या ट़ॉप ५० लोकांची एक यादी तयार करण्यात आली आहे. या रिपोर्टनुसार जमशेदजी टाटा यांनी गेल्या १०० वर्षांत तब्बल १०२ बिलियन डॉलर्सचे दान केले आहे.

यामुळे त्यांचे देशात आदराने घेतले जाते. सध्याच्या कोरोना काळात टाटा समूहाने देशाला मोठी मदत केली आहे. टाटा समूहाच्या कंपन्या काही रक्कम गोळा करत आहेत, ज्यातून हॉस्पिटल बेड्स, ऑक्सिजन पुरवठा आणि आपल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण या गोष्टी सहजरित्या शक्य होणार आहे.

अनेक ठिकाणी टाटा यांनी मोठी मदत पाठवून दिली आहे. टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा आणि टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या पुढाकाराने ‘नो लिमिट’ मदतीची एक योजना आखली आहे. टाटा समूह या योजनेसाठी तब्बल २००० कोटी रुपये खर्च करणार आहे. यामुळे त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.

भारतातील मोठ्या दानशूर व्यक्तींमध्ये विप्रोचे अजीम प्रेमजी यांचाही समावेश आहे. असे असताना मात्र गेल्या १०० वर्षांच्या दानशूर लोकांच्या यादीत टाटा समुहाचे संस्थापक जमशेदजी टाटा हे प्रथम स्थानी आहेत. टाटांनी आरोग्य आणि शिक्षणासाठी मोठे दान दिले आहे.

कोरोना काळात त्यांनी मोठी मदत केल्याने अनेकांनी त्यांना देवदूत म्हटले आहे. परदेशातून त्यांनी अनेक गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे अनेकांचे जीव वाचले आहेत. आपल्या कंपनीमध्ये ते सर्व कामगारांची मदत करतात.

ताज्या बातम्या

ओ तेरी! महिलेनं घातलं 264 झूम मिटिंगला एकच शर्ट, पण शेवटच्या दिवशी झालं असं की…

Indian Idol 12; ट्रोल होत असलेल्या शण्मुखप्रिया बद्दल जावेद अख्तर यांनी केले धक्कदायक विधान, म्हणाले…

संजय दत्तच्या या गर्लफ्रेंडला वैतागले होते सुनील दत्त; ब्रेकअप करण्याचे दिले आदेश

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.