Share

Jamshed J Irani : टाटा समूहावर कोसळला दुखाःचा डोंगर; भारताचा स्टीलमॅन काळाच्या पडद्याआड

Jamshed J Irani

Jamshed J Irani : भारताचे ‘स्टील मॅन’ म्हणून ओळखले जाणारे जमशेद जे इराणी यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. ३१ ऑक्टोबरला सोमवारी रात्री जमशेदपूरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जमशेद जे इराणी हे ८६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे सगळीकडे शोक व्यक्त केला जात आहे.

इराणी जून २०११ मध्ये टाटा स्टीलच्या संचालक मंडळातून निवृत्त झाले होते. जमशेद जे इराणी यांचा जन्म २ जून १९३६ रोजी नागपूरमध्ये झाला. त्यांनी नागपूरच्या विज्ञान महाविद्यालयातून त्यांचे बीएस्सी पूर्ण केले. त्यानंतर नागपूर विद्यापीठातून त्यांनी एमएस्सीचे शिक्षण पूर्ण केले.

त्यांनी त्यांचे पुढचे शिक्षण विदेशात पूर्ण केले. पुढे जमशेद जे इराणी यांनी १९६३ मध्ये ब्रिटिश आयर्न अँड स्टील रिसर्च असोसीएशनमधून त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली. परंतु, त्यांचे स्वप्न हे नेहमीच देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देण्याचे होते. त्यामुळे १९६८ मध्ये ते भारतात परतले.

त्यांनतर त्यांनी टाटा स्टील कंपनीसोबत काम सुरु केले. टाटा स्टील आणि टाटा सन्स व्यतिरिक्त इराणी यांनी टाटा मोटर्स आणि टाटा टेलिसर्व्हिसेससह टाटा ग्रुपच्या अनेक कंपन्यांचे संचालक म्हणून काम केले. इराणी यांच्या पश्चात त्यांची पत्नी डेझी इराणी आणि त्यांची तीन मुले झुबिन, निलोफर आणि तनाज आहेत.

त्यांच्या निधनानंतर, टाटा स्टीलने ट्विट केले आहे की, भारताचे स्टील मॅन म्हणून ओळखले जाणारे पद्मभूषण डॉ. जमशेद जे इराणी यांच्या निधनाने खूप दुःख झाले आहे. टाटा स्टील परिवार जमशेद जे इराणी त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या प्रियजनांप्रती मनापासून शोक व्यक्त करतो.

जमशेद जे टाटा यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. इराणी यांनी चार दशकांहून अधिक काळ भारतीय उद्योग, पोलाद व्यवसाय आणि टाटामध्ये मोठे योगदान दिले आहे. आता त्यांच्या निधनामुळे भारताचा ‘स्टील मॅन’ हरवला असे बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या
Rambha car accident : सलमान खानच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा भीषण अपघात, गाडीचा चक्काचूर तर मुलगी गंभीर जखमी
kirit somaiya : किरीट सोमय्यांमुळे माझ्या सासूचं निधन, किशोरी पेडणेकरांच्या खळबळजनक आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ
VIDEO: हातात मशाल अन् तोंडात पेट्रोल, फुंकर मारल्यावर असा भडका झाला की.., पाहून धक्का बसेल
Sachin tendulkar : याला म्हणतात साधेपणा! क्रिकेटच्या देवाने टपरीवाल्याचा चहा घेतला अन् त्याची इच्छाही पुर्ण केली

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now