दहशतवाद्याच्या गोळीने घेतला रस्त्यावर उभ्या असलेल्या पोलीसाचा बळी; भयानक घटनेचा व्हिडीओ व्हायरल

जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये एका दहशतवाद्याने भर बाजारात एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळ्या झाडल्या आहेत. श्रीनगरच्या खायनार भागात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात पोलीस कर्मचारी अर्शीद मीर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पोलीस कर्मचारी रस्त्यावर चालताना दिसून येत आहे. तेवढ्यात मागून एक दहशतवादी येतो आणि पोलिसांवर गोळीबार करतो. आणि काही वेळातच तो घटनास्थळावरून पळून जातो. गोळ्या लागताच पोलीस कर्मचारी जागेवरच खाली पडतो.

रस्त्यावर जाणारा एक व्यक्ती दहशतवाद्याच्या मागे धावतो पण दहशतवादी फरार होतो नंतर मागे येऊन एका दुसऱ्या व्यक्ती सोबत तो पोलीस कर्मचाऱ्यास तातडीने रस्त्यावरून उचलून रुग्णालयात दाखल करतात.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी १२ सप्टेंबर रोजी दुपारी १.३५ च्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर त्या पोलीस अधिकाऱ्यास एसकेआईएमएम रुग्णालयात दाखल केले उपचारादम्यानच त्यांचा मृत्यू झाला.

अर्शीद हा कुपवाडा जिल्यातील कुलमुना भागातील रहिवासी होता. त्याला ३ गोळ्या लागल्या असून डॉक्टरांनी वाचवण्यासाठी सर्वोत्तोपरी प्रयत्न केले त्याचावर शस्त्रक्रियाही करण्यात आली पण त्याला वाचवण्यात यश आले नाही.

काश्मिरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांनी अर्शीदच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला असून शहीद पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केली आहे.

 

महत्वाच्या बातम्या
अक्षयकुमारच्या आईच्या निधनानंतर मोदी बुडाले प्रचंड दुखात; अक्षयला पत्र लिहून म्हणाले..
सिंगमफेम खलनायक अनंत जोग यांची बायको सुद्धा आहे अभिनेत्री! दिसायला आहे खूपच सुंदर; पहा फोटो
सूनेने केली सासूला जबर मारहाण, मुलगा बघतच राहीला; सूनेच्या या घाणेरड्या कृत्यावर नेटकरी संतापले
साकीनाका रेप केस: निलम गोऱ्हे थेट वर्षावर दाखल; मुख्यमंत्र्यांना दिला ‘हा’ सल्ला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.