संघ संकटात असतानाही जेमिसन मात्र तरुणीसोबत स्मितहास्य करण्यात व्यस्त, तंबूतील तरुणीचा फोटो व्हायरल..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबलेली आयपीएल स्पर्धा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. काल विराट कोहलीच्या रॉयल चँलेजर्स बंगळुरुला दुसऱ्या पर्वातील सलामीच्या सामन्यात इयॉन मॉर्गनच्या कोलकाता नाईट रायडर्सने धुळ चारली. केकेआर यामध्ये मोठा विजय मिळवला आहे. यामुळे पुन्हा एकदा विराट कोहलीवर टीका करण्यात आली.

असे असताना मात्र आरसीबीचा वेगवान गोलंदाज कायल जेमिसन याची देखील मोठी चर्चा झाली. मैदानाबाहेर तंबूत बसलेला जेमिसनचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो एका महिलेकडे बघत हसताना दिसत आहे. यामुळे ही महिला नक्की आहे तरी कोण याची चर्चा सुरू झाली आहे.

या फोटोमध्ये हे दोघे चांगलेच गप्पा मारताना दिसत आहेत. जेमिसनच्या या फोटोवर अनेक कमेंट्स आल्या असून अनेकांनी हा फोटो शेअर करत भन्नाट प्रतिक्रिया लिहिल्या आहेत. यामुळे सामना संपल्यानंतर देखील याचीच चर्चा सुरू होती.

अनेकांनी याला पुरुष काय पुरुषच राहतील असी कमेंट केली आहे. तर काहींनी संघ कितीही अडचणीत असून जेमिसन आपल्याच दुनियेत अशाही कमेंट केल्या आहेत. यावर अनेक मिम्स देखील व्हायरल होत आहेत. त्यांच्यात काय संवाद सुरू आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

असे असताना आरसीबीच्या डग आऊटमध्ये बसलेली मुलगी टीमची मसाज थेरपिस्ट नवनीता गौतम आहे, अशी माहिती समोर येत आहे. दोन वर्षांपूर्वी नवनीता गौतम आरसीबीच्या टीमसोबत जोडली गेली होती. मसाज थेरपिस्टच्या पेशात नवनीताला बराच अनुभव आहे. यामुळे तिचे फोटो व्हायरल झाले आहेत.

याशिवाय ती भारताच्या महिला बास्केटबॉल टीमसोबत आशिया कपमध्येही होती. मात्र टीम संकटात असताना सुरू असलेली चर्चा अनेक चाहत्यांना आवडली नाही. अनेकांनी यावर वेगवेगळ्या कमेंट्स देखील केल्या आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.