फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील कीर्तीचा जीन्स वरील डान्स बघून तुम्ही व्हाल घायाळ

स्टार प्रवाह वाहिनी सध्या मनोरंजनाच्या बाबतीत नंबर एक चनेल पैकी एक आहे. स्टार प्रवाह वरील अनेक मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून बसल्या आहेत. मालिकांमध्ये अनेक नवनवीन वळण आपल्याला पाहायला मिळतात. ते सगळ पाहत असताना पुढील भागात काय होईल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात.

फुलाला सुगंध मातीचा या मालिकेने सुरुवातीपासूनच अनेकांची मने जिंकली. या मालिकेतील मुख्य पात्र शुभम कीर्ती यांच्यामुळेच मालिकेला जास्त प्रसिद्धी मिळाली. या मालिकेतील सगळ्याच पात्रांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची माने जिंकून घेतली आहे. या मालिकेत काही भागात शिक्षणाचे महत्व देखील पटवून दिले आहे.

फुलाला सुगंध मातीचा मालिकेत शुभमचे पात्र हर्षद अतकरी व कीर्तीचे पात्र समृध्दी केळकर हे साकारत आहेत. आयपीएस होण्याचे स्वप्न बाळगणारी कीर्तीचे लग्न आचारी शुभम सोबत झाले. एकीकडे अत्यंत हुशार मुलगी आणि दुसरीकडे अशिक्षित आचारी मुलगा त्यांचे नाते दाखवले आहे.

मनाविरुद्ध लग्न झाले असताना दोघांचे प्रेम हळूहळू कसे फुलून येते हे या मालिकेत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या मालिकेतील कीर्ती म्हणजेच समृद्धी केळकर काही दिवसांपूर्वी तिने केलेला एक डान्स सोशल मिडीयावर शेअर केला आहे. तिचा हा डान्स व्हिडीओ व्हायरल होताना दिसून येत आहेत.

सध्या ट्रेंडिंग असलेल्या “रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना” या गाण्यावर समृध्दीने चक्क जीन्स वर नाचताना दिसून आली. मालिकेत नेहमीच साधी सरळ साडीवर दिसणारी समृद्धीला जीन्स वर पाहून अनेक जण घायाळ झालेले पाहायला मिळते. अभिनया सोबतच समृध्दी एक उत्तम डान्सर असल्याचे दिसून येत आहे.

समृद्धीच्या या डान्सवरून ती एक उत्तम डान्सर असलेली आपल्याला समजते. ती यापूर्वीही डान्सचे व्हीडीओ सोशल मिडीयावर शेअर केलेले पाहायला मिळतात. सध्या फुलाला सुगंध मातीचा मालिकेत शुभम कीर्तीच्या नात्यातील दुरावा कमी होत असून यापुढे दोघांचे प्रेमळ क्षण पाहायला मिळत आहे.

हे ही वाचा-

आधी सगळी संपत्ती नावावर करा तरच मी किडणी देईल; कोरोनाग्रस्ताच्या पत्नीचा दवाखान्यातच रूद्रावतार

आदि गोदरेज: १७ वर्षांच्या वयात घर सोडले, आज आहे ४.५ अब्ज डॉलर्सचे मालक

साऊथचा सुप्रसिद्ध कलाकार अल्लू अर्जुनया& चित्रपटामुळे झाला फेमस; जाणून घ्या आयुष्याला कलाटणी देणारा चित्रपट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.