Jalgaon Family died due to Shock : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील एरंडोल (Erandol) तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. वारखेडी (Warkhedi) गावात बुधवारी पहाटे शेताभोवती लावलेल्या तारेच्या कुंपणात विद्युतप्रवाह सोडण्यात आल्याने एका संपूर्ण कुटुंबावर काळाने झडप घातली. या कुंपणाला स्पर्श झाल्यामुळे पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन वर्षांची दुर्गा पावरा (Durga Pawara) ही चिमुरडी आश्चर्यकारकरित्या बचावली.
कुंपणातील करंटने घेतले पाच जीव
या दुर्घटनेत विकास रामलाल पावरा (Vikas Pawara, वय 35), त्यांची पत्नी सुमन पावरा (Suman Pawara, वय 30), मुलगा पवन (Pavan, वय 4), मुलगा कवल (Kaval, वय 3) आणि विकास यांची सासू यांचा मृत्यू झाला. या अचानक झालेल्या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
दोन वर्षांची दुर्गा मृतदेहांजवळ बसून रडत होती
धक्कादायक बाब म्हणजे, या सर्वांच्या मृत्यूनंतर लहानगी दुर्गा (Durga) जिवंत राहिली. पोलीस (Police) घटनास्थळी पोहोचले तेव्हा ती आपल्या आई-वडिलांच्या व इतर नातेवाईकांच्या मृतदेहाजवळ बसून रडत होती. हे दृश्य पाहून पोलिस व ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रू तरळले. महिला पोलीस कर्मचारी मधुरा पवार (Madhura Pawar) यांनी दुर्गाला जवळ घेऊन तिची समजूत काढली. सध्या दुर्गाची जबाबदारी तिच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आली आहे.
रानडुक्करांपासून मका वाचवण्यासाठी शेतात सोडला करंट
वारखेडीतील बंडू पाटील (Bandu Patil) या शेतकऱ्याने आपल्या शेतातील मका रानडुक्करांपासून वाचवण्यासाठी तारेच्या कुंपणाला करंट सोडला होता. मात्र, मजूर विकास पावरा यांचे कुटुंब शेताजवळील पायवाटेने जात असताना या कुंपणाला स्पर्श झाला आणि पाचांचा मृत्यू झाला. दुसरीकडे, दोन वर्षांची दुर्गा मृतांच्या शेजारी बसून रडत असल्याचे दृश्य सकाळी बंडू पाटील यांच्या नजरेस आले.
या दुर्घटनेमुळे वारखेडी परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. मजुरांचे संपूर्ण कुटुंब एका क्षणात उद्ध्वस्त झाल्याने गावकरी शोकाकुल झाले आहेत.