बीएचआर घोटाळा प्रकरणाचे पुरावे आहेत; एकनाथ खडसेंचा गौप्यस्‍फोट

मुंबई | ‘बीएचआर गैरव्यवहार प्रकरणी २०१८ पासून पाठपुरावा करत आहे. केंद्र शासनाकडून याची चौकशी करण्याचे आदेश असताना देखील त्‍यावेळी प्रकरण दडपण्यात आले. मात्र आता यातील सर्व सत्‍य बाहेर येणार असून, या प्रकरणात बड्या नेत्‍याचे नाव असून ज्‍याचा संबंध मंत्र्यांशी राहिला असल्‍याचा गौप्यस्‍फोट खडसे यांनी केला आहे.

बीएचआर सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू असताना माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सोमवरी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी सदर प्रकरणात पाठपुरावा करणाऱ्या ॲड. किर्ती पाटील देखील उपस्‍थित होत्‍या.

तसेच ते पुढे बोलताना म्हणाले, ‘बीएचआर’ पतसंस्थेतील ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सध्या आर्थिक गुन्हे विभागाकडून चौकशी सुरू असून, यात शेकडो जण गुंतले आहेत. राज्यात फडणवीस सरकार असताना त्यांनी हे प्रकरण दडपले होते.

मात्र, महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणी चौकशी सुरू केल्यामुळे ठेवीदारांना न्याय मिळेल. त्यामुळे या सरकारचे आपण अभिनंदन करत आहोत, असे मत खडसे यांनी व्यक्त केले.

तसेच २०१८ मध्ये याबाबत ठेवीदारांनी माझ्यासह खासदार रक्षा खडसे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. ॲड. कीर्ती पाटील यांनी या फसवणुकीबाबत सविस्तर माहितीही दिली होती. मात्र, त्या वेळी त्यांनी या प्रकरणाबाबत काहीही कारवाई केली नाही, असे खडसे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या
सार्वजनिक ठिकाणांपेक्षा घरामध्ये कोरोना संसर्ग होण्याची शक्यता जास्त, संशोधनातून खुलासा
३२ वर्षांपूर्वी! कॉंग्रेस सरकारला झुकवणाऱ्या रांगड्या नेत्याच्या एक हाकेने जमा झाले होते लाखो शेतकरी
जयंत पाटील भाजपच्या संपर्कात? खुद्द पाटलांकडून खुलासा, म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.