तीनवेळा लग्न अन् तीनवेळा मोडला संसार; माहेरी आलेल्या मुलीने खुर्चीवर बसलेल्या बापासोबत केलं ‘हे’ भयानक कृत्य

असे म्हणतात लग्न करणे सोपे असते पण ते नाते टिकवणे अवघड असते, त्यामुळे अशा नात्याच्या वादातून अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. आता अशीच एक धक्कादायक घटना जळगावातील मलकापूरमधून समोर आली आहे.

मलकापूरमध्ये राहणाऱ्या एका मुलीने आपल्या भावाच्या मदतीने मिळून वडिलांची हत्या केली आहे. वडिलांचे नाव गुलाबराव रावणचवरे असून त्यांचे वय ५२ वर्षे होते. बुधवारी रात्री सुभाषचंद्र बोस नगरात ही धक्कादायक घटना घडली आहे.

गुलाबराव यांच्या मुलीचे नाव लक्ष्मी असे आहे. गुलाबरावांनी लक्ष्मीचे तीनवेळा लग्न लावून दिले होते. पण तरीही ती नीट संसार करत नव्हती. त्यामुळे तिचे वडिल तिच्यावर रागवायचे. तसेच तिसऱ्या लग्नानंतर आता पुन्हा एकदा तिचा संसार मोडला होता, पण वडिलांनी तिला घरात घेण्यास नकार दिला.

वडिल घरात घेत नसल्यामुळे मुलीने वडिलांसोबत मोठा वाद घातला. त्यानंतर मुलीचा संसार मोडल्यामुळे गुलाबरावांनी त्या रात्री दारु पिलेली होती आणि ते दारुच्या नशेत खुर्चीवर बसलेले होते. त्याचवेळी मुलीने संधी साधून वडिलांची हत्या केली आहे.

१९ वर्षीय मुलगी लक्ष्मीने २८ वर्षीये पुतण्या प्रकाशराव साहेबराव रावणचवरे याच्यासोबत मिळून वडिलांची हत्या केली आहे. दोघांनी संगनमताने गुलाबराव यांच्या छातीत वार केले. या हल्ल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते, त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यु झाला आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक तिथे दाखल झाले आहे. लक्ष्मीला आणि प्रकारशला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

महत्वाच्या बातम्या-

..तर मला ८५ व्या वर्षी ठाकरे सरकारविरोधात आंदोलन करावे लागेल; अण्णा हजारे पुन्हा मैदानात
राहूल गांधी समुद्रात पोहले, त्यांनी पुशअप्स मारले, त्यांचा शर्ट घामाने भिजला की भक्तांना घाम का फुटतो?
..तर मला ८५ व्या वर्षी ठाकरे सरकारविरोधात आंदोलन करावे लागेल; अण्णा हजारे पुन्हा मैदानात

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.