१६ व्या वर्षी सायकलीवर गूळ विक्री, आज २० कोटी रुपयांचा टर्नओव्हर! वाचा तरुणाची यशोगाथा..

पुणे । आपल्याला आयुष्यात यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. फक्त त्यासाठी कष्ट करण्याची तयारी असावी लागते. सुरुवातीला छोट्या व्यवसायातून तुम्ही मोठे उद्योजक देखील होऊ शकता. यामध्ये आता पुणे जिल्ह्यातील जवळे येथील खालकर बंधू यांचे नाव घेतले जाते. एक काळ होता ते सायकलवरून गूळ विकत होते. आज त्यांनी मोठी गरुडझेप घेतली आहे.

सायकलवर गूळ विकणाऱ्या खालकर यांनी आज गुळाच्या विक्रीतून करोडोंचा व्यवसाय उभारला आहे. अनेकांना याबाबत माहिती नाही, पण ते खरे आहे. खालकर यांचा गूळ आज २८ वेगवेगळ्या देशात जातो. ते आज २० कोटींची वार्षिक उलाढाल करतात.

सायकलीवरून गुळ विकून त्यांनी हे विश्व निर्माण केले आहे. त्यांनी मोठा सय्यम दाखवला. आंबेगाव तालुक्यातील जवळे गावात सामान्य शेतकरी असलेल्या खालकर कुटुंबात अमित आणि अनिकेत या भावंडांचा जन्म झाला. वडिलांनी दोन्ही भावंडाना शिकवले. अनिकेतने सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे.

अनिकेतला शिक्षण झाल्यावर नोकरी करण्यापेक्षा स्वतःचे काही तरी करून दाखवायचे होते. यामुळे तो खटपट करत होता. शेती असल्याने त्याने १६ व्या वर्षी शेतीच्या संबंधीत व्यवसाय करायचे ठरवले. त्याने गूळनिर्मितीचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. स्थानीक स्तरापासून सुरु करून आज अनिकेतने आपला व्यवसाय परदेशात नेऊन पोहचला आहे.

आता तो कोट्यावधीची उलाढाल करत आहे. यामुळे अनेकांसाठी त्याने आदर्श निर्माण केला आहे. त्याने शेतकऱ्यांना देखील चांगले पैसे दिले आहेत. त्याने यासाठी शेतकऱ्यांची साखळीच तयार केली आहे. अनिकेत आणि अमित हे शेतकऱ्यांना ३००० रुपयांपर्यंत प्रति टन भाव देतात. यामुळे शेतकरी देखील समाधानी आहेत.

त्याचे आता गूळ निर्मितीचे ६ प्लॉट आहेत. ज्यातून त्यांनी ३०० ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नेटवर्कच तयार केले आहे. थोडक्यात व्यवसाय सुरू झाला होता, मात्र आता तो प्रचंड विस्तारला आहे. यामुळे तरुणांपुढे त्यांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायातून देखील पैसे कमवतात येतात हे दाखवून दिले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.